• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपण आजकाल आसपास अशी लै गाढवं बघतोय, ज्यांनी कटकारस्थानं करून उच्चपदं मिळवलीत..!

tdadmin by tdadmin
December 11, 2024
in मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, कोकण, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, Featured
0
आपण आजकाल आसपास अशी लै गाढवं बघतोय, ज्यांनी कटकारस्थानं करून उच्चपदं मिळवलीत..!

किरण माने, मराठी चित्रपट अभिनेते

लायकी नसलेला उथळ, भंपक, अज्ञानी माणूस कितीही मोठ्या सत्तेच्या – अधिकाराच्या पदावर बसला तरी एक ना एक दिवस तो स्वत:चे गुण उधळायला सुरूवात करतो.. आणि मग चारचौघांत हसं करून घेतो !

वर्चस्ववादी व्यवस्थेत असे भरपूर उथळ लोक भरलेले असतात. उच्चपद सांभाळायला, त्या पदाची गरीमा राखायला संयम, विवेक, बुद्धीमत्ता या गोष्टी अंगी असाव्या लागतात, त्या त्यांच्याकडे नसतात !
अशांची लक्षणं सांगताना तुकोबाराया म्हणतात,

“गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवें भेटी केली तेणें ।।सहज गुण जयाचे देहीं । पालट कांहीं नव्हे तया ।।
माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावूनि टाकी थुंकोनि । तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ।।”

….गाढवाच्या अंगाला चंदनाची उटी लावून त्याला सजवला तरी ते नंतर उकिरड्यावर जाऊन लोळून तिथली राख अंगाला लावून घेणारच.…प्रत्येकाच्या अंगी जे ‘सहज गुण’ असतात ते कधीही बदलत नाहीत.
…माकडाच्या गळ्यात मौल्यवान मणी घातला, तरी माकड तो मणी चावून थुंकून टाकतं. शेवटी तुका म्हणे, “मुर्खाला कितीही हिताचं सांगा.. ते त्याला आवडत नाही. अडाणी आठमुठ्यासारखा तो आपल्याच बिनडोक मतांचा हेका धरून रहातो.”

पटलं का? पटायलाच पाहिजे वो ! आपण आजकाल आसपास अशी लै गाढवं बघतोय, ज्यांनी कटकारस्थानं करून उच्चपदं मिळवलीत. स्वत:च स्वत:ची जाहिरातबाजी करून स्वत:च्याच अंगाला प्रसिद्धीची- यशाची ‘चंदनाची उटी’ लावलीय… पण शेवटी स्वभावानुसार ते निर्बुद्ध बोलबच्चनगिरीच्या उकीरड्यावर लोळतानाच दिसतात ! मग कुणीही येऊन त्यांना टपली मारून जातं.

जोकर होतो त्यांचा जोकर. पण याऊलट काहीजण पदावर असो वा नसो, त्यांचा वाघासारखा रूबाब असतो… कारण प्रचंड कष्टानं मिळवलेली विनयशील विद्या त्यांच्या अंगी असते. चेहऱ्यावर ज्ञानाचं तेज असतं. पाठीचा ताठ कणा आणि सत्यवचनी बाणा त्याला आणखी उंचीवर नेऊन ठेवतो. उथळ असलेला उच्चपदस्थ त्याच्यासमोर किरकोळ, छाटछुट वाटू लागतो. म्हणूनच इतिहासाच्या नजरेत लाखोंचे सैन्य बाळगून महाशक्तीमान असलेला औरंगजेब, मूठभर मावळे साथीला असलेल्या छ. शिवरायांसमोर कस्पटासमान आहे.

भावांनो, तुकोबाराया समजून घेतला की लै गोष्टी सोप्या होतात. तुकोबाराया आपल्याला वैचारिक डोळसपणा देतो… अंधभक्तीपास्नं लांब ठेवतो.. आपल्या हितासाठीच त्यानं हा शब्दरूपी खजिना ठेवलाय.. आपल्या आज्ज्यापणज्यांनी जपत – जपत तो आपल्यापर्यन्त पोचवलाय.आपण त्याकडं दुर्लक्ष केलं तर आपल्यासारखे करंटे आपणच. इठ्ठलइठ्ठलइठ्ठल.

Next Post
आग्र्यातील शिवाजी महाराजांचे निवासस्थान दुर्लक्षित अवस्थेत! राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी!

आग्र्यातील शिवाजी महाराजांचे निवासस्थान दुर्लक्षित अवस्थेत! राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group