बारामती : महान्यूज लाईव्ह
काल बारामतीत तपासलेल्या कोरोनाच्या संशयित नमुन्यांमधून ६२ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. काल दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ७१ वर पोचली आहे. बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या २९६४ झाली आहे.
काल बारामतीत तपासलेल्या आरटीपीसीआर नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये खांडज येथील १६ वर्षीय मुलगी, १३ वर्षीय मुलगी, १४ वर्षीय मुलगी, माळेगाव बुद्रुक येथील ९ वर्षीय मुलगी, ३० वर्षीय महिला, २९ वर्षीय महिला, ५४ वर्षीय पुरूष, ५८ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ४० वर्षीय महिला,२७ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरूष, २ वर्षीय मुलगा, ५ वर्षीय मुलगा, ५० वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
कोऱ्हाळे बुद्रुक येथील ५ वर्षीय मुलगा, ४२ वर्षीय महिला, ६८ वर्षीय महिला, निरावागज येथील ५५ वर्षीय पुरूष. शिरष्णे येथील ६५ वर्षीय महिला, बुरूडगल्ली येथील ३६ वर्षीय महिला, अशोकनगर येथील १६ वर्षीय महिला, माळेगाव खुर्द येथील २५ वर्षीय महिला, सांगवी येथील ७० वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगा, ७५ वर्षीय पुरूष, कटफळ येथील २८ वर्षीय पुरूष, चव्हाणवस्ती कसबा येथील ५६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
आमराई येथील ५७ वर्षीय महिला, ३१ वर्षीय पुरूष, दत्त बेकरी नजिक ३३ वर्षीय पुरूष, पाटस रोड येथील ४० वर्षीय महिला, एकतानगर येथील २४ वर्षीय महिला, मुरूम येथील ५८ वर्षीय महिला, सायली हिल येथील ७ वर्षीय मुलगा, लोणीभापकर येथील ८५ वर्षीय महिला, ५६ वर्षीय पुरूष, मुर्टी येथील ६२ वर्षीय पुरूष, फलटण रोड येथील ५३ वर्षीय पुरूष, मोरगाव रोड येथील ३८ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय पुरूष, टेकाळेवाडी येथील २७ वर्षीय महिला, ताटे इस्टेट येथील ७० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
आज बारामतीतील शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत सूर्यनगरी येथील ३० वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला, ३ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष, बांदलवाडी येथील २४ वर्षीय युवक, सावळ येथील ३७ वर्षीय पुरूष, वाणेवस्ती बारामतीतील ४५ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
बारामतीतील खासगी मंगल लॅबोरेटरी येथे आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सांगवी, मिलींदनगर येथील ३३ वर्षीय पुरूष, कांबळेश्वर, बारववस्ती येथील ८७ वर्षीय पुरूष, गुनवडी रोड तांबे इस्टेट येथील ३७ वर्षीय पुरूष, हरिकृपानगर दत्त रेसिडेन्सी येथील २० वर्षीय युवक, वणवे निवास रुई पाटी येथील ६ वर्षीय मुलगी, ३२ वर्षीय महिला, ३६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील एक कोरोनाबाधिताचा समावेश
काल बारामतीत तपासणी झालेल्या आरटीपीसीआर तपासणीत इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी (संजयनगर) येथील ९० वर्षीय महिला रुग्ण कोरोनाबाधित आढळली आहे. विशेष म्हणजे इंदापूर तालुक्यातील बहुतेक सर्व गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्त आढळले आहेत. मात्र सपकळवाडी गावात एकही रुग्ण आजपर्यंत नव्हता. आज सपकळवाडीत कोरोनाने शिरकाव केला. काही दिवसांपूर्वीच सपकळवाडी गावाने पुणे जिल्ह्यात सर्वप्रथम गावाचे कोविड केअर सेंटर उभारले आहे.











