नांदेड : महान्यूज लाईव्ह
सिडको मधील तिरूमला ऑइल या कंपनीमध्ये एक डिसेंबर रोजी मोठा स्फोट झाला.. तपासात शॉर्टसर्किटमुळे हा स्फोट होऊन आग लागल्याचे दिसून आले, मात्र या घटनेमध्ये पाच जण गंभीर जखमी झाले होते. यामध्ये कंपनीचे मालक, त्यांची दोन मुले आणि इतर दोघेजण यांचा समावेश होता. हैदराबाद मधील उपचारादरम्यान काल रात्री दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला, तर वडील अत्यवस्थ आहेत.
सिडको औद्योगिक वसाहतीत भास्कर कोत्तावार यांच्या मालकीची तिरूमला ऑइल मिल आहे. या ठिकाणी रविवारी एक डिसेंबर रोजी आग लागली या आगीत मालक भास्कर कोत्तावार, त्यांची दोन मुले विजय भास्कर कोत्तावर व हर्षद भास्कर कोत्तावार तसेच सुनील बंडेवार व सुधाकर बंडेवार हे गंभीर जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात पाठवले होते.
उपचारादरम्यान विजय आणि हर्षद ची प्रकृती गंभीर बनली. शुक्रवारी रात्री दोघांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी हर्षद आणि विजय यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याच दरम्यान वडील भास्कर कोत्तावार यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याने परिसरात व औद्योगिक क्षेत्रांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.











