कोल्हापूर : महान्यूज लाईव्ह
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मांढरे गावची घटना. गावातील एकाच कुटुंबातील चौघेजण अत्यवस्थ झाले. यातच वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांच्या तीन मुलांपैकी दोघा भावांचे निधन झाले. आता तिसरा ही भाऊ अत्यवस्थ असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे.
गावातील पांडुरंग पाटील यांच्या कुटुंबात ही घटना घडली अचानक पांडुरंग पाटील यांची आणि त्यांच्या मुलांची प्रकृती बिघडली. उपचारादरम्यान आठवड्यापूर्वीच पांडुरंग पाटील यांचे निधन झाले. यातून घर सावरत नाही, तोच त्यांच्या दोन मुलांचा कृष्णात पांडुरंग पाटील आणि रोहित पांडुरंग पाटील या दोघांची प्रकृती अचानक बिघडली. अन्नातून विषबाधा झाले असावी असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र मंगळवारी कृष्णात आणि रोहित या दोघांचाही मृत्यू झाला.
३२ वर्षीय प्रदीप पांडुरंग पाटील यांची देखील प्रकृती अत्यवस्थ आहे. या सर्वांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान या कुटुंबातील इतर लोकांना मात्र त्रास झालेला नाही. त्यामुळे नेमका प्रकार काय आहे हे निष्पन्न झाल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी नातेवाईकांची भूमिका होती त्यावर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी वैद्यकीय अहवाल आल्यानंतर तपासांती कारवाई करू अशी आश्वासन दिले.











