पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यात 22 वर्षीय मुलगा त्याच्या मैत्रिणीला अल्पवयीन मैत्रिणीला वाढदिवस साजरा करण्यासाठी अज्ञात ठिकाणी घेऊन गेला आणि वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून या मुलीकडे त्याने शरीरसुखाची मागणी केली. या प्रकरणी संबंधित मुलाच्या विरोधात विनयभंगाच्या गुन्ह्यासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या 22 वर्षाच्या मुलाची 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख आहे. 22 वर्षाच्या मुलाचा काही काळापूर्वी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलाने मुलीला अनोळखी ठिकाणी एका इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या खोलीत नेले आणि माझा वाढदिवस असून मला तुझ्याकडून गिफ्ट पाहिजे म्हणत सेक्सची मागणी केली.
या मुलीने नकार दिल्यानंतर त्याने पिडीतेला मिठी मारून विनयभंग केला अशी फिर्याद या मुलीने फरासखाना पोलिसांकडे दिली. त्यावरून पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यापासून बालकांच्या संरक्षण कायदा 2012 अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास फौजदार अमोल काळे करत आहेत.











