लोकसंख्या वाढीचा दर 2.1% पेक्षा कमी झाला, तर हिंदूंचा प्रभाव धोक्यात येईल, त्यामुळे आता दोन नव्हे तर एका कुटुंबाला किमान तीन मुले जन्माला घातली पाहिजेत असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. या वक्तव्यामुळे बरीच चर्चा सुरू असून असदुद्दीन ओवैसी यांनी देखील यावर मत व्यक्त केले आहे.
मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरून ओवैसी म्हणाले, हे खरंतर मोदींना सांगायला पाहिजे. आधी पार्लमेंटमध्ये हा विचार आणला पाहिजे कारण त्यांची सत्ता आहे. एका सभेत मोदी म्हणाले होते की, मुसलमान लोक खूप मुलं जन्माला घालतात. मोदी म्हणाले होते की, जे जास्त मुलं पैदा करतात, त्यांच्या हातात तुमचे मंगळसूत्र काँग्रेसवाले देतील अशी टिका केली होती, पण आता मोहन भागवत वेगळेच बोलतात, तुम्ही काहीतरी नक्की भूमिका घ्या असा टोला ओवैसी यांनी लगावला आहे.











