दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वाई तालुक्यातील जांभळी गावातील एका बंद असलेल्या फार्म हाऊसचे कुलुप तोडून तब्बल २२ हजार ३०० रुपयांच्या किमतींची चोरी झाली होती सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोट्याला पकडले आहे.
या फार्म हाऊस मधील वस्तु चोरून नेताना संदीप किसन कांबळे हा चोरटा तेथे असलेल्या सिसीटिव्ही कॅमेऱ्यात दिसून आल्याने त्याच्या विरोधात फार्महाऊसची देखभाल करणारे स्वानंद सुरेश जोशी (वय ३९ रा. ब्राह्मणशाही वाई) यांनी वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई तालुक्याच्या पश्चिम भागाच्या जांभळी गावामध्ये गट नंबर ३२/६ मध्ये फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसचे कुलुप तोडुन जांभळी गावचाच रहिवासी असलेला संदीप किसन कांबळे हा सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आत घुसला.
त्याने सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून तेथील ८ हजार रुपये किंमत असणारी किर्लोस्कर कंपनीची पाण्याची इलेक्ट्रीक मोटार व १४ हजार ३०० रुपये किंमतीची प्रत्येकी १० किलो वजन असणारी दोन तांब्याची तपेली असा २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान संदीप किसन कांबळे यास वाई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अधिक तपास वाई पोलिस करीत आहेत.











