दिवाळीच्या काळात नातेवाईकांच्या गावाला घाईगडबडीने जाणाऱ्या प्रत्येकाने सावधान.. कधी कधी छोटी छोटी गोष्ट ही आपल्या कळत नाही.. अन् नेमकं काय घडतं! इंदापूर तालुक्यातल्या भिगवणमध्ये अवघ्या काही क्षणात अख्खी बस जळून खाक झाली.. कारण काय तर पहा टायरची हवा कमी झाली त्यामुळे लायनर गरम झाले लायनर गरम झाल्यामुळे टायरने पेट घेतला आणि टायरने पेट घेतल्यानंतर फक्त काही वेळात हे धावती बस जळून खाक झाली..!
ही घटना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवणनजिक पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली. इंदापूर येथे बंद पडलेल्या अवस्थेत असलेली (क्र. एम. एच १४ बीटी ४३९७) ही दुरुस्त करण्यासाठी दापोडी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत नेली जात होती. ही बस नादुरुस्त होती परंतु ती चालवली जात असल्याने बस चालकाच्या पाठीमागील बाजूचा टायर हवा कमी झाल्याने त्याचे लायनर गरम झाले.
मिळत असलेल्या माहितीनुसार अचानक हवा कमी झाल्याने त्याचा दाब टायरच्या लायनरवर आला. लायनर प्रचंड गरम झाले. ते लक्षात न आल्याने तशीच बस चालू राहिली. गरम झालेल्या लाइनरमुळे टायरने पेट घेतला. टायरची आग काही क्षणातच बसला लागली आणि काही प्रमाणात डिझेल असल्यामुळे पूर्ण बस पेटली काही मिनिटाच्या आत ही बस पूर्ण जळून खाक झाली. मात्र बस ने पेट घेताच या बसला घेऊन जाणाऱ्या बसचा चालक आणि आग लागलेल्या बसचा चालक दोघांनीही उड्या मारल्या आणि दोघेही सुरक्षित बचावले.
ही घटना घडताच बसची आग विझवण्यासाठी कुरकुंभ एमआयडीसी, बिल्ट ग्राफिकच्या अग्निशमनपथकाची वाहने त्या ठिकाणी पोचली. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी देखील मदत केली. मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. अर्थात ही बस नादुरुस्त असल्याने दुरुस्तीसाठी चालवली असल्याने त्यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.











