बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शरद पवारांनी त्यांचेच सख्खे पुतणे योगेंद्र पवारांना आता मैदानात उतरवले आहे बारामतीची लढत वरकरणी कार्यकर्त्यांना सोपी वाटत असली तरी, शरद पवारांच्या भाषणानंतर अजित पवारांनी ती हलक्यात घेतलेली नाही.
आज एकाच दिवसात अजित पवारांनी 59 गावांमध्ये भेट देण्याचे ठरवले असून, सकाळपासून ते विविध गावांना भेटी देत आहेत. प्रत्येक गावामध्ये पाच ते दहा मिनिटे वेळ देत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. प्रचाराचा नारळ फोडताना अजित पवारांनी आपण बारामती मध्ये तीन दिवस असणार आहोत, असे सांगितले होते. त्यांनी आता सर्व गावांमध्ये जाण्याचे ठरवले असून प्रत्येक गावामध्ये जाऊन कार्यकर्त्यांना भेटून त्यांना आपली भूमिका ते सांगणार आहेत.
पहिल्यांदाच अजित पवार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावात जात असल्याने लोकांमध्ये देखील उत्सुकता आहे. विधानसभेची निवडणूक ही अजित पवार आणि योगेंद्र पवार अशी वरवरची दिसत असली, तरी ती प्रत्यक्षात शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच असणार आहे. कारण तब्बल 56 वर्षानंतर पहिल्यांदा शरद पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघात इतर उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः उपस्थित राहिले होते.
लोकसभेच्या वेळीही लढत सुप्रिया सुळे वृद्ध सुमित्रा पवार असली तरी प्रत्यक्षात शरद पवार विरुद्ध अजित पवार असेच त्याला स्वरूप आले होते. शरद पवारांच्या दोन दिवसापूर्वीच्या भाषणानंतर बारामतीतील राजकीय वातावरणाची संभाव्य तीव्रता लक्षात घेत, अजित पवारांनी सर्व गावांमध्ये भेटी देऊन आपला प्रचार आणखी बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे.











