राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्याचा तिढा सुटता सुटत नव्हता. मात्र आज अखेर दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला. प्रवेश झाल्या झाल्या एबी फॉर्म देऊन त्यांना दौंडची उमेदवारी देखील निश्चित करण्यात आली आहे.
आज सकाळी रमेश थोरात हे शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेत आले होते. त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार असून शरद पवार देतील तो निर्णय मान्य करू असे रमेश थोरात यांनी सांगितले होते. मात्र शरद पवारांची भेट घेतल्यानंतर तिथेच पक्ष प्रवेश देखील झाला आणि त्यांना एबी फॉर्म देऊन ची उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता दौंड तालुक्यात आमदार राहुल कुलविरुद्ध माजी आमदार रमेश थोरात अशी अटीतटीची लढत होईल. शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे रमेश थोरात यांच्या समर्थकांना हत्तीचे बळ आले असेल. अर्थात प्रचाराची दिशा काय ठरते त्यावर पुढील दिशा अवलंबून असेल.











