राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : पाटस – कानगाव रोडवर दुचाकीला पाठीमागून हुंडाई कंपनीच्या चारचाकी अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन अपघाताची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. मात्र पाटस पोलिसांनी अपघात नसून घातपात असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही माहिती पाटस पोलीसांनी दिली.
अक्षय गोपीनाथ चव्हाण, सुरज विजय पवार (दोघेही रा. पाटस ता. दौंड जि पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की , १७ ऑक्टोंबर २०२४ रोजी रात्री १०:४५ वाजण्याच्या आसपास सुमारास पाटस-कानगाव रोडवर पाटस येथील पळसे पुर्नवसन डी. पी. जवळ वैभव दिवेकर (रा.पाटस ) हा पाटस बाजूकडून कानगाव बाजूकडे दुचाकी ( नं.एम.एच.४२ सी.९८४३) वरुन घरी जात होता.
पाठीमागुन आलेली ग्रे रंगाची हुंडाई कंपनीची व्हेन्यू मॉडेलची नंबर नसलेल्या चारचाकी कारने भरधाव वेगात मोटार सायकलला धडक दिली. या अपघातात वैभवच्या दोन्ही खांदयाला, डोक्याला, कपाळास, उजव्या पायास मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. तसेच दुसरी नुकसान झालं होते. अपघाताची घटना घडल्यानंतर चार चाकी वाहन चालक फरार झाला होता.
याबाबत पाटस पोलीस चौकीला अज्ञान वाहन चालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटस पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला होता. मात्र पाटस पोलीस चौकीचे
पोलीस उपनिरीक्षक सलिम शेख यांना अपघाताची शंका आली आणि त्यांनी तपासाची सूत्रे हलवली. वरीष्ठ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना यासंदर्भात कल्पना देऊन तात्रिंक विश्लेषन व सी. सी. टी. व्ही. तपासणी करून गोपनीय माहीती घेऊन अपघाताची सखोल चौकशी केली असता, हा अपघात नसून अपघाताचा बनाव करून कट रचून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न केले.
अक्षय गोपीनाथ चव्हाण यास ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली असता, त्याने वैभव दिवेकरला चारचाकी गाडीने धडक देऊन जिवे ठार मारण्यासाठी अक्षय बबन कोळेकर ( रा. पाटस ता. दौंड जि. पुणे) याने मला तसेच तुषार चोरमले, सुरज विजय पवार( रा. पाटस ता. दौंड जि.पुणे ) व लाला पाटील (रा.भिगवण ता. इंदापुर जि. पुणे) या चार जणांना ५ लाख रूपयाची सुपारी दिली असल्याची कबुली दिली.
या प्रकरणी पाटस पोलीसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास पाटस पोलीस चौकीचे फौजदार सलीम शेख हे करीत आहेत. पाटस पोलीस चौकीचे फौजदार सलीम शेख, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, सहाय्यक फौजदार महेंद्र फणसे, अनिल ओमासे, भानुदास बंडगर, हिरालाल खोमणे, अक्षय यादव, संदीप देवकर, महेंद्र चांदणे, विकास कापरे, रामदास जगताप, कानिफनाथ पानसरे, पोलीस शिपाई मारूती बाराते, गणेश मुटेकर आदींच्या पथकाने केली.
या कामगिरीबद्दल पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस आदी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख व पाटस पोलीसांचे कौतुक केले आहे.











