मुंबई : महान्यूज लाईव्ह
सोन्या चांदीचे दागिने दिवाळी, दसऱ्याला घेण्याची आपल्याकडील प्रथा आहे. मात्र इराण आणि इस्त्राइल मध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी महागले आहे. जीएसटी धरून आता सोने 85 हजारावर जाण्याची शक्यता आहे, कारण आता 22 कॅरेटचे सोने प्रति तोळा 72 हजार 550 रुपये, तर 24 कॅरेट च्या सोन्याचा भाव प्रति तोळा 79 हजार 130 रुपयांवर पोहोचला आहे.
येत्या काही दिवसात सोने 85 हजार रुपयांचा टप्पा गाठेल अशी स्थिती आहे. सध्या जीएसटी धरून सोने तिथपर्यंत पोहोचू लागले आहे. वास्तविक पाहता इराण इस्त्राईलचे युद्ध सुरू असताना देखील मागच्या चार- पाच दिवसांमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार आले होते. मात्र काल अचानक 870 रुपये प्रति तोळा सोने वाढल्याने सोन्याचे दर थेट ८० हजारावर पोचले आहेत. येत्या काही दिवसात हे सोने 85 हजार रुपयांचा आकडा गाठेल अशी स्थिती आहे.
चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे 11 ऑक्टोबर रोजी चांदी दोन हजाराने वाढली, तर 18 ऑक्टोबर रोजी पुन्हा चांदी दोन हजार रुपये किलोने वाढले आहे. आता चांदी एक लाख रुपयांवर पोचली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 99 हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता.











