दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई पोलिसांनी दुचाकी चोरावर करडी नजर ठेवली आणि खानापूरच्या परिसरात सापळा रचून दुचाकी चोराला पकडले. त्याच्याकडून दोन दुचाकी ही जप्त केल्या.
4 ऑक्टोबर 2024 रोजी वाई शहरातील रविवार पेठ चौकातील गणपती मंदिराच्या बाजूला असलेल्या दुकानाच्या समोरील जागेत हँडल लॉक केलेली हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची दुजाकी क्रमांक एम एच 11 सीई 0679 ही दुचाकी चोरीला गेल्याची खबर फिर्यादीने दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या घटने प्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा दुचाकी चोरटा वाई तालुक्यातील खानापूर गावचा असल्याचे पोलिसांना संशयात आले. 5 ऑक्टोबर 2024 रोजी हा चोरटा वाई तालुक्यातील खानापूर गावाच्या परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी वाई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे फौजदार सुधीर वाळुंज आणि त्यांच्या पथकाला या दुचाकी चोराला पकडण्याची सूचना केली.
या पथकाने सापळा रचून जितेंद्र हनुमंत पवार याला पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता 4 ऑक्टोबर रोजी चोरलेली हिरो होंडा स्प्लेंडर आपण चोरल्याची त्यांनी कबूल दिली, तसेच वेळे परिसरातील आराम हॉटेल शेजारी लावलेली होंडा ट्रिगर गाडी क्रमांक एम हेच 11 बी यु 9 5 0 3 ही गाडी देखील आपणच चोरल्याचे त्याने सांगितले. त्यावरून पोलिसांनी दोनही दुचाकी ताब्यात घेतल्या व जप्त केल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे फौजदार सुधीर वाळुंज, राम कोळी, नितीन कदम, हेमंत शिंदे, श्रावण राठोड, विशाल शिंदे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास हवालदार पाटणकर करत आहेत.











