पुणे : महान्यूज लाईव्ह
फार्मसी क्षेत्रातील विविध मान्यवरांचा व राज्य लोकसेवा आयोगातील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अन्न आणि औषध प्रशासनाचे माजी आयुक्त महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पुण्यातील पत्रकार भवनात झाला.
6 ऑक्टोबर रोजी झालेल्या या विशेष कार्यक्रमात प्राचार्य बी. एस. कुचेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने तसेच शिक्षण, उद्योग क्षेत्रातील चंद्रशेखर बोबडे, वैभव शिळीमकर, सागर पायगुडे यांनाही सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे एमपीएससीच्या 2022 मधील परिक्षेत एनटीसी प्रवर्गात राज्यात प्रथम आलेले हनुमंत बनगर व एमपीएससी 2023 राज्यसेवेत राज्यात प्रथम आलेले डॉ.महेश घाटोळे, पीएसआय राज्यात प्रथम आलेले महेश घुटुकडे, सचिन टेकवडे, मयुरी सूर्यवंशी, चेतन पानसरे यांच्यासह अनेक उमेदवारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी महेश झगडे यांच्यासह माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, उद्योजक अभयसिंह जगताप, महाराष्ट्र फार्मसी चे आयोजक आदित्य वगरे उपस्थित होते.
यानिमित्ताने महाराष्ट्र फार्मसी कडून फार्मासिस्ट डे निमित्त राष्ट्रीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामधील 18 विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.
महाराष्ट्र फार्मसीचे आयोजक आदित्य वगरे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात महेश झगडे यांनी सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी फार्मासिस्टच्या योगदानाची कबुली दिली. महाराष्ट्रात दोन हजार औषध निरीक्षक पदे भरणे अत्यावश्यक असून मी आयुक्त म्हणून कार्यरत असताना राज्य शासनास कळविले होते, फार्मसी दुर्लक्षित नसणारे क्षेत्र आहे, परंतु ते उपेक्षित राहिले आहे त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. फार्मासिस्ट हाच खरा रुग्णाचा मित्र आहे, हे त्यांनी अमेरिकेच्या उदाहरणाने सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी बनकर व प्रा. गुणवंत अवचर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सुरज हांगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्निल कदम, किरण लोखंडे, दीपक राणे, माधुरी गलगुंडे, पंकज धनवे यांनी योगदान दिले.











