बारामती : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसात बारामतीत घडणाऱ्या घटना शाळकरी मुलांबरोबरच पालकांसाठी ही चिंता सतावणाऱ्या असतानाच आता पुन्हा एकदा बारामतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महाविद्यालयात जात असलेल्या अल्पवयीन मुलीला धमकी देत कारमध्ये बसवून निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर कार मध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, याप्रकरणी शहर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीने शहर पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार शारदानगर माळेगाव येथील रस्त्याच्या बाजूला निर्जन स्थळी हा प्रकार घडला.
बारामतीतील चंद्रमणीनगर येथील युवकाविरोधात शहर पोलिसांनी पोक्सो, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार आरोपी हा पीडित मुलगी महाविद्यालयात येत असताना महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येत असे पीडित युवतीला बोलावून कारमध्ये बसवून घेऊन जात होता. महाविद्यालय सुटल्यावर देखील गेटवरूनच तो तिला कारमध्ये जबरदस्ती बसवून निर्जन स्थळी नेत असायचा. तिला मारून टाकेन असे धमकी देऊन कारमध्येच तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध करायचा असे या फिर्यादीत नमूद केले आहे.











