• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीतला प्रत्येक पालक चिंतातूर आहे… दररोजचा दिवस मोजू लागला आहे! याचसाठी केला होता का अट्टाहास? असं म्हणतो आहे..!

tdadmin by tdadmin
October 2, 2024
in संपादकीय, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
काल खरंच तिथे वालचंदनगरचे पोलीस पोचले नसते तर?

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

प्रा. धनंजय माने, बारामती

टीव्ही चॅनेल्स आणि मीडियाच्या बातम्या वाचून काल मन सुन्न झालं… मनात अनेक प्रश्नांचं काहूर उठायला लागलं. शिक्षण व्यवस्थेबद्दल समाज व्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न मनात उभे ठाकले. एक पालक म्हणून आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी, व त्याही पलीकडे या सगळ्या गोष्टींचा होणारा परिणाम यासारख्या प्रश्नांचे वादळ घोंगावत राहिले.

खून झालेल्या विद्यार्थ्याच्या आईने केलेला आक्रोश, किंकाळ्या व्यवस्थेला नक्की समजतील का? माणसांच्या संवेदना बोथट झाल्या की संवेदना संपून गेल्या असंच वाटायला लागलं. जीवन जगत असतानाचा हा नवा संघर्ष आज प्रत्येकाला भेडसावतोय. बारामती हे शिक्षणाचे,विद्येचे माहेरघर म्हणून आपण आज बघतो. नवनवीन बदल हे नेहमी पहिल्यांदा बारामतीत होताना पण बघतो.

एकीकडे तीन खासदार, एक उपमुख्यमंत्री एक आमदार अशी परिस्थिती असतानाही या सर्व गोष्टी सावरतील का? एखाद्या माणसाचा मृत्यू समोर डोळ्यासमोर दिसत असताना, त्याचा जीव वाचवण्यासाठी कित्येक गर्दीतल्या लोकांना आपण जावं व त्याला वाचवावं असं का वाटलं नाही? की व्हाट्सअप फेसबुक सारखी एखादी मीडियातील वाचत पहात असलेली घटना समोर घडते आहे व आपण फक्त स्क्रीन वरून बोटं फिरवतोय असं तर वाटलं नसेल?

लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आपला मुलगा अचानक त्याचा झालेला खून व ही कानावर पडलेली बातमी आई-वडिलांच्या मनाला कशी स्पर्शून किंवा चिरडून गेली असेल? असे अनेक प्रश्नांचे काहूर माझ्या मनात यायला लागले. काही ज्येष्ठ व्यक्तींच्या बद्दलच्या चर्चाही अशा होत्या की, आम्हीही त्याच कॉलेजला शिकलो आम्हीही छाती काढून चालायचो पण असा प्रकार कधी कोणी केला नसल्याचे ही चर्चिले जातेय.

अल्पवयीन पिढ्यांना सुसंस्कारांची फार मोठी गरज आहे. त्यांच्या व्यथा वेदना व प्रश्न समजून घेण्याची गरज आहे यासाठी व्यवस्था कमी पडते का? असंही वाटतं. एक मित्र म्हणून आपला सवंगडी आपलाच दुश्मन बनेल असं कधी त्याला वाटलं असेल का? छोट्या छोट्या चुकांवरती इतकं प्रक्षोभक आणि विभित्सपणे ही अल्पवयीन पिढी वागून नेमकं काय साध्य करू इच्छिते?

समाज मनाबरोबरच समाज हेही एक पुस्तक आहे आपण वास्तवाला धरून वागतो का, शिक्षण व्यवस्था नेमकी कुणीकडे चालली हा देखील एक प्रश्नच आहे. हीच घडलेली घटना आपल्या उंबऱ्यापर्यंत यायला जास्त कालावधी लागणार नाही. म्हणूनच आज प्रत्येक पालकांच्या मनात भीतीच वातावरण बारामतीत आपण बघतोय. शिक्षण व्यवस्थेबरोबरच त्याचे पालकही यासाठी तितकेच जबाबदार असावेत. अशा वाईट घटनांचा लवकरच बंदोबस्त होईल अशी आशा वाटते.

Next Post
भिगवणमध्ये रिलस्टार मुलींना कोणी मारले? खरं नेमकं काय? भिगवण पोलिसांची अवस्था सांगता येईना, सहन होईना अशी झालीय का? 

मैत्रीसाठी ब्लॅकमेल केले.. जबरदस्तीने धार्मिक विधी केला.. मांसही खायला घातले.. लिव्ह इन रिलेशनशिपसाठी चुलता चुलती देखील या कृत्यात सामील झाले; एवढे अनर्थ इंदापूर, बारामतीत घडले! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group