दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरात आज १४ जण नव्याने कोरोनाबाधित आढळले आहेत.
शहरातील उपजिल्हा रूग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. उपजिल्हा रूग्णालयातील कोवीड सेंटर पूर्ण भरल्याने या दोन्ही कोरोना रूग्णांना घरीच उपचार सुरू आहेत.
शहरातील उपजिल्हा रुग्णालय कोवीड सेंटर मध्ये आज बुधवारी ७० जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये २ ते ४२ वयोगटातील ८ महिला व ६ पुरुषांना कोरोनाची बाधा झाली. दौंड शहरात ७, राज्य राखीव गट १, गोपाळवाडी ४ व ग्रामीण भागात 2 असे एकूण १४ रूग्ण आढळले असेही उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी सांगितले.











