महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
निवडणुक आयोगाने शरद पवारांचा आरोप फेटाळून लावत स्पष्टीकरण दिले असून नोटीस बजावली नाही असे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्तीकर विभागाची नोटीस मिळाली आहे. राजकीय विरोधकांना प्राप्तीकर विभागाच्या माध्यमातून नोटीसा बजावून त्यांच्यावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान निवडणुक आयोगाने शरद पवारांचा आरोप फेटाळला असून नोटीस देण्यात आली नव्हती असे सांगितले.
निवडणूक आयोगाने निवेदन प्रसिद्ध करत सांगितले की, भारतीय निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला शरद पवारांना नोटीस बजावण्यासाठी कोणताही आदेश दिला नव्हता.
सन 2009 , 2014 व 2020 मधील निवडणुकांमधील प्रतिज्ञापत्रावरील माहितीनुसार प्राप्तिकर विभागाने आपल्याला नोटीस बजावली असून त्याला लवकरच उत्तर देऊ अशी माहीती शरद पवार यांनी मंगळवारी दिली.
संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद वाटतो अशा शब्दांत पवारांनी केंद्रात सत्ताधारी भाजपाला टोला हाणला होता, त्यामुळे आयोगाने आपली उडी होऊ नये म्हणून लगेच स्पष्टीकरण दिले.











