सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : निरा नरसिंहपुर येथील नृसिंह मंदिराच्या लक्ष्मी घाटावर मंगळवारी (दिनांक 17) रोजी वेदपाठ शाळेतील गणपती विसर्जनात गेलेल्या सोळा वर्षीय मुलाचा नीरा नदीच्या पात्रात बुडाला होता. ग्रामस्थांनी, व मच्छीमारांनी प्रशासना बरोबर शोधमोहीम राबविली.परंतु या शोध कार्याला अपयश आले. रात्री अंधार झाल्याने हे शोध कार्य थांबले.काल बुधवारी (दि.18) पाणबुडी व ऑक्सिजनच्या मदत घेऊन पुण्याच्या दोघांनी हा मृतदेह शोधला.
अनिकेत विनायक कुलकर्णी (वय16 वर्षे रा. हांडुर्गी ता.भुम जि.धाराशिव) असे पाण्यात बुडून मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. नीरा नरसिंहपुर येथील नरसिंह मंदिराच्या लक्ष्मी घाटावर तो वेदपाठ शाळेत शिकत होता. या घटनेची खबर अभयकुमार पांडुरंग वांकर(राहणार निरा नरसिंहपुर ता.इंदापूर) यांनी पोलीस ठाण्यात दिली.
अभय कुमार वांकर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.17) दुपारी 3/45 वाजता गावातून फोनवरून मिळालेल्या माहितीवरून लक्ष्मी घाटावर वेदपाठशाळेतील गणपती विसर्जनास गेलेला अनिकेत विनायक कुलकर्णी हा नीरा नदीचे पात्रात लक्ष्मी घाटाजवळ पाण्यामध्ये बुडाला आहे. तरी तुम्ही लवकर या असे कळविले असता आपण स्वतः त्या ठिकाणी हजर झालो.
यावेळी गावातील सरपंच सरवदे, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राउत, ग्रामपंचायत सदस्य आनंद काकडे तसेच गणेश सरवदे व इतर लोक सदर ठिकाणी गेले. त्या ठिकाणी आम्ही स्वतः व पोहता येणारे लोक मच्छिमार होडीच्या तसेच पाण्यामध्ये कॅमेरा टाकुन रात्री 8/00 वा. पर्यंत पाहणी केली परंतु पाण्यामध्ये बुडालेला मुलगा मिळून आला नाही. त्यानंतर जास्त अंधार झाल्याने शोधकार्य थांबविले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी काल बुधवारी (दि.18) सकाळी 8 पासुन होडीच्या सहाय्याने नीरा नदीपात्रात शोध घेतला. परंतु मुलगा मिळून आला नाही. त्यानंतर सकाळी 11 च्या सुमारास पुणे येथील ऋषिकेश विजय शिवतारे व त्यांचे सोबत बनारसी चौहाण असे दोघेजण आले. त्यांनी पाणबुडी व आक्सीजनचे सहाय्याने पाण्यामध्ये बुडुन शोध घेतला असता त्यांना लगेच अनिकेत चा मृतदेह मिळून आला.
त्याला गावातील लोकांच्या मदतीने नदीपात्राचे वरती काढले. बावडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री धोंडीबा हारते यांनी त्याची तपासणी करून मयत झाल्याचे घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.











