महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
टाईम मॅगझीनने 2020 च्या जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
दरवर्षी टाईम मॅगझीनकडून ही यादी जारी करण्यात येते. या यादीत जगभरातील निरनिराळ्या क्षेत्रतील व्यक्तींचा समावेश केला जातो. या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांच्या नावापुर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांना स्थान देण्यात आले आहे.
या व्यतिरिक्त या यादीत गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्यमान खुराना, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्ता आणि शाहीन बाग परिसरातील आंदोलनात सामील असलेल्या बिल्कीस यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
टाईम मॅगझीनच्या यादीत जगातील वेगवेगळ्या क्षेत्रातील 100 प्रभावीशाली व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे. यावेळी अनेक नेत्यांचा यात समावेश आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव असे भारतीय नेते आहेत ज्यांना या यादीत दुसऱ्यांदा स्थान देण्यात आले आहे.











