बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. युवतीशी मैत्री केल्याच्या कारणावरून तिघाजणांनी दुचाकीवर बसवून नेऊन माळेगावच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाठीमागील नीरा डाव्या कालव्याच्या नजीकच्या मोकळ्या जागेत नेले. तिथे आणखी तिघेजण थांबले होते. या निर्जन स्थळी माळेगाव मधील युवकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत संबंधित युवक गंभीर जखमी झाला असून, त्याची कवटी फुटली आहे. त्यास पुढील उपचारासाठी पुण्याला दाखल करण्यात आले आहे.
अक्षय बाळासाहेब जाधव (वय : 29 रा. माळेगाव ता. बारामती) असे या जखमी युवकाचे नाव असून त्याचे वडील बाळासाहेब लक्ष्मण जाधव यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी यश राजेंद्र कांबळे, अमित अविनाश कांबळे (दोघे रा. खांडज) व उत्कर्ष दत्तात्रय भोसले (रा. माळेगाव) आणि आणखी तीन अनोळखी मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान माळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी हा युवक गंभीर जखमी झाला. या मारहाणीत त्याची डोक्याची कवटी फुटली. त्यास तातडीने पुण्यातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास माळेगाव पोलीस करत आहेत.











