बुलढाणा : महान्यूज लाईव्ह
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर भागातील घटना पुण्यामध्ये पोलीस निरीक्षकावर तलवार हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आता बुलढाणा शहरातही गुन्हेगारीने डोके वर काढलेले पाहायला मिळाले आहे मात्र यामध्ये गुन्हेगारांची मजल एवढी गेले की त्यांनी थेट पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कोयत्याने हल्ला केला आहे.
या राज्यामध्ये सातत्याने पोलिसांवर हल्ले होत असताना गुंडगिरीला मात्र कोणताच वचक नाही असे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांचे माकड कोणी केले हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलीस ठाण्यात नुकत्याच नियुक्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या सेवेच्या पहिल्याच दिवशी गुन्हेगाराने त्याच्यावर हल्ला केला.
तडीपार व कुख्यात आरोपी मलकापूर शहरात आला होता डुकरे बांधण्यावरून त्याने वाद घातला तसेच त्याच्याकडे अवैध शस्त्रे विक्रीसाठी असल्याची माहिती मिळाल्याने या तडीपार गुन्हेगारावर छापा टाकण्यासाठी हे पोलीस पथक गेले होते. म्हाडा कॉलनी परिसरात हा हल्ला झाला. या परिसरात मनोजसिंग टाक हा गुन्हेगार अवैधरित्या शस्त्रांचा साठा करून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर मनोजसिंग टाक याने तलवारीने हल्ला केला. यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक फौजदार व एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. घटनेच्या दरम्यान मनोजसिंग टाक हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
मनोज सिंग टाक याच्यावर 27 गुन्हे दाखल आहेत. दोनदा तो तडीपार झालेला आहे. शेजारच्या ब्रह्मादे कुटुंबातल्या लोकांबरोबर डुकरे बांधण्यावरून त्याचा वाद झाला. त्यावरून हाणामारी झाली. यात ब्रह्मादे कुटुंबातील तिघेजण जखमी झाले होते. त्यामुळे पोलीस मनोज सिंग टाक याला शोधण्यासाठी म्हाडा कॉलनी परिसरात आले. तेव्हा नळगंगा नदीच्या बाजूला असलेल्या झुडपात दडून बसलेल्या मनोज सिंग टाक याने अचानक बाहेर येऊन तलवारीने पोलिसांवर हल्ला केला.











