जळगाव : महान्यूज लाईव्ह
नेपाळच्या बस दुर्घटनेत महाराष्ट्रातील 25 जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला त्यामधील बहुसंख्य कुटुंब ही जळगाव मधील आहेत. या घटनेमध्ये काही कुटुंबेच्या कुटुंब आख्खी या दुर्घटनेमध्ये संपली, उध्वस्त झाली. या कुटुंबाच्या आठवणींनी जळगावकर शोकाकुल आहेत. याच कुटुंबापैकी एक कुटुंब होतं गणेश भारंबे यांचं!
काही वर्षांपूर्वी वीज वितरण कंपनीत नोकरीला असलेले वडील विजेच्या खांबावर दुरुस्तीसाठी चढले आणि विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला. अनुकंपा तत्वावर त्यांची आई वीज वितरण कंपनीत लिपिक म्हणून नोकरी करत होती, तर गणेश भारंबे हे एका ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून काम करत होते. नेपाळच्या घटनेमध्ये आई पत्नी व आठ वर्षाच्या मुलीसह गणेश यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
अध्यात्मिक प्रवृत्तीच्या व देवाधर्मावर प्रचंड विश्वास असणाऱ्या गणेश यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूमुळे भुसावळच्या तुकारामनगर भागातील लोक हळहळले आहेत. लोकांनी म्हातारे झाल्यावरच देवदर्शन करावे असे नाही, तर आपण चालते बोलते आहोत, तेव्हाच देवदर्शन केले पाहिजे. मी अगोदर देवदर्शन करणार आणि नंतर पैसे कमावण्याच्या मार्गाला लागेल, असं उपराठे वाटेल, परंतु देवाप्रती गाढ विश्वास असलेले धोरण गणेश भारंबे यांचे होतं.
गणेश भारंबे यांचे मित्र सारंग केऱ्हाळकर यांनी या संदर्भात भावना व्यक्त केल्या. कधीही कामातून वेळ मिळाला की, गणेश देवदर्शन ला जायचे.











