महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
अनेक खटले पाहिले, मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
माझ्या शहराच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसेठी मला कुणीही थांबवू शकत नाही असे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले. अभिनेत्री कंगना राणावत कार्यालय पाडकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात संजय राऊत यांनी प्रतिवादी करण्यात आल्यानंतर त्यांनी हे ट्विट केले आहे.
एका अभिनेत्रीने उच्च न्यायालयात महापालिकेने अवैध बांधकामाबाबत केलेल्या कारवाईबाबत याचिका दाखल केली आहे. महापालिका ही स्वायत्ता संस्था आहे. मात्र तरीही यात राज्यसभेच्या खासदाराला पक्षकार करण्यात यावे. अशी मागणी तिने केल्याचे संजय राऊत म्हणाले.
बाबरी खटला असो किंवा मराठी अस्मितेबाबतची केस असो, अशा अनेक खटल्यांना सामोरे गेलो आहे. तेव्हा अशा केसमुळे माझ्या शहराच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसेठी लढण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.










