सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : भरधाव वेगाने जात असलेल्या बुलेटने पायी चालत जाणा-या महिलेला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात महिला जागीच ठार झाली..
शालन शिवा काळे (वय 55 वर्ष, रा. शिंगाडे वस्ती तालुका इंदापूर जि.पुणे) असे बुलेटच्या धडकेत मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर बुलेट चालक स्वप्निल लहू गोरे (रा. माळवाडी नं.2 ता. इंदापूर) याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची फिर्याद मयत शालन काळे यांचा भाऊ हरी शिवा काळे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
ही घटना रविवारी (दि.11 रोजी) इंदापूर जवळील माळवाडी नंबर 2 च्या हद्दीतील संतोष भागवत यांचे आईस्क्रीम फॅक्टरी जवळील रोडवर दुपारी साडेतीन वाजता घडली. इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेतील स्वप्निल लहू गोरे याने लाल रंगाची बुलेट मोटरसायकल (नंबर Mh 42/BK/8264 ) हयगयीने अविचाराने रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करून त्याच्या ताब्यातील बुलेट भरधाव वेगाने चालवली.
त्यावेळी बुलेटने चालत जाणाऱ्या शालन शिवा काळे (वय 55 वर्ष रा. शिंगाडे वस्ती ता इंदापूर जि पुणे) हिस पाठीमागून धडक दिली. या अपघातात शालन काळे यांच्या डोक्याला हातापायाला गंभीर जखमी होऊन ती ठार झाली. बुलेट मोटर सायकलस्वार स्वप्निल भाऊ गोरे याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसहिता कलम- 281,106( 1 )(2) ,125 (a), 125(b), 324 (4)(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नगराळे करत आहेत.











