सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. लाडक्या बहिणीची सुरक्षीतता धोक्यात आली असून गृह खाते निद्रिस्त आहे, महिलांची सुरक्षा वा-यावर सोडणा-या सरकार विरोधात तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज इंदापूरात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे..
आज सकाळी ११वाजता इंदापूर तहसील कार्यालयावर हा निषेध मोर्चा आंदोलन काढण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या सुचनेवरुन हे आंदोलन काढण्यात आले आहे.
एकीकडे लाडकी बहीण योजनेचा डंका वाजवला जात असताना महिलाच सुरक्षित नाहीत. उरण असो की शीळफाटा हे त्याचेच एक उदाहरण आहे. राज्याचे गृहखाते निद्रिस्त आहे, यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी आज मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेस महिला व युवती आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.











