पुणे : महान्यूज लाईव्ह
माय मरो मावशी उरो असं म्हणतात, पण मावशीच करतं काय ठरली तर पुणे जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे जिथे सख्या मावशीनेच अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने बहिणीच्या मुलीचं अपहरण केलं. मावशी एवढी बेदरकार की सख्ख्या बहिणीच्या घरी जाऊन तिथं सांत्वन देखील केलं पण पोलिसांनी या घटनेचं बिंग फोडलं.
पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुक्यातील टाकळी बुद्रुक या ठिकाणी तेरा वर्षीय मुलीच्या अपहरणाचा कट आणि अपहरणाचा प्रयत्न उघडकीस आला आहे. यामध्ये मावळ पोलिसांनी सख्या मावशीलाच ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली. यामध्ये मुलीचे अपहरण असल्याने व सध्या राज्यातील व देशातील सामाजिक वातावरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी गांभीर्याने घेतलेल्या या प्रकरणात परिसरातील तब्बल 50 ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले आणि पोलिसांनी मावशीला ताब्यात घेतले.
या मावशीने टाकवे बुद्रुक येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने पळवून नेले. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर हैराण झालेल्या आईबापांचे सांत्वन देखील या मावशीने केले. मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिसात देताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात पोलीस एका विशिष्ट घटनेपर्यंत पोहोचले.
पोलिसांनी यातील दोन अल्पवयीन मुलांना येरवड्याच्या बालसुधारगृहात पाठवले असून, मावशीला अटक केली आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास केल्याने ही मुलगी माण या गावातून सुरक्षितरित्या ताब्यात घेतली. मात्र या घटनेमध्ये या मुलीचे अपहरण करण्याचा हेतू काय होता, ते अजूनही स्पष्ट झाले नसल्याने पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत.











