भवानीनगर : महान्यूज लाईव्ह
छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक व छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर यांच्या पत्नी राधिका निंबाळकर यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले.
पुण्यातील फातिमानगर येथे त्यांचे आज पहाटे पावणेदोन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 56 वर्षांच्या होत्या. भू विकास बँकेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर हे त्यांचे पती होत.
सणसरचे माजी सरपंच पांडुरंग निंबाळकर, अध्यात्मिक क्षेत्रातील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय निंबाळकर यांच्या त्या भावजय होत, तर इंदापूरच्या बाजार समितीचे संचालक संग्राम सिंह निंबाळकर हे त्यांचे पुतणे होत. आज सकाळी 11 वाजता सणसर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.











