पुणे : महान्यूज लाईव्ह
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आयएएस पदाच्या प्रवासाचा डोंगर खोदता, खोदता नवनवीन प्रकरणे समोर समोर येऊ लागली आहेत. पूजा खेडकर च्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला असे बसून कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केला त्यातून नॉन क्रिमीलेअर प्रवर्गातून पूजा खेडकर आयएएस झाल्याची चर्चा सुरू झाली आणि आता मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर खरोखरच विभक्त राहतात का की त्यांनी केवळ मुलीला आईएएस करण्यासाठी घटस्फोट दाखवला याची चौकशी सुरू झाली आहे.
मराठीत एक म्हण आहे, खोटे बोलता येते पण ते सिद्ध करण्यासाठी अनेक यातायात करावी लागतात आणि कधीकधी ते उघड झाले की, बऱ्याच कंगोऱ्यांनी ते उघड होतात. पूजा खेडकर प्रकरणात असेच काहीसे झाले आहे. एक खोटे लपवण्यात अनेक प्रकरणं उघड होऊ लागली आहेत. पूजा खेडकर यांना एवढे मोठे उत्पन्न असताना आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा असलेले नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळालेच कसे? याची सुरुवातीपासूनच चर्चा होती. तो विषय हाती घेतलेल्यांनी आता नवीनच प्रकरण बाहेर काढले आहे. ते म्हणजे मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा घटस्फोट!
आता हेही प्रकरण पूजा खेडकर यांच्या दिव्यांग सर्टिफिकेट सारखच पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतला, त्यातूनच त्यांना नॉन क्रिमिलियर चे सर्टिफिकेट मिळाले. पूजा खेडकर यांचे वडील शासकीय सेवेत होते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक होते, मग ते उत्पन्न कमी दाखवण्यासाठी घटस्फोटाची बाजू दाखवली का? असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात असून, या संदर्भात देखील केंद्र सरकारने अहवाल मागितलेला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे मसुरीतील लाल बहादूर शास्त्री प्रशिक्षण अकादमीने त्यांचे प्रशिक्षण थांबवले आहे. तिसरीकडे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या आरोपांची देखील चौकशी सुरू आहे नॉन क्रिमिलियर गटातून आयएएस होण्याच्या संदर्भातील घटस्फोटाची प्रकरण सीआयडी कडे जाणार आहे त्यामुळे एकूणच या प्रकरणात नवे नवे ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत.











