• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छत्रपती मध्ये आजपासून अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली जाचक अध्याय सुरू..; १७ वर्षानंतर आज `छत्रपती`त सुखद घटना घडणार

Maha News Live by Maha News Live
September 22, 2020
in शेती शिवार, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
छत्रपती मध्ये आजपासून अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली  जाचक अध्याय सुरू..; १७ वर्षानंतर आज `छत्रपती`त सुखद घटना घडणार

इंदापूर : महान्यूज लाईव्ह

छत्रपती कारखान्यात राजकीय हस्तांतर होणार व १७ वर्षांपासूनचे कट्टर विरोधक पृथ्वीराज जाचक यांचे पवार कुटुंबाशी मनोमिलन होणार हा महान्यूज ने तीन महिन्यांपूर्वी केलेला होरा आज खरा ठरणार असून आज छत्रपती कारखान्यात होणाऱ्या अधिकारी मुलाखतीसाठी जाचक यांना उपस्थित राहण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पवारसाहेबांच्या घरी केलेल्या भोजनानंतर पुन्हा एकदा सहकारातील हा गोडवा आज खऱ्या अर्थाने वाढणार असून त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून परिश्रम घेत असलेले ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांची शिष्टाई फळाला आली आहे.


आज दुपारी छत्रपती कारखान्यात नव्याने कार्यकारी संचालकांसह काही अधिकारी नियुक्त करायचे आहेत, पुढील काळात कसोटीच्या हंगामासाठी ज्यांची आवश्यकता आहे, त्यांना निवडण्यासाठी या मुलाखती अभ्यासपूर्ण झाल्या पाहिजेत व त्यासाठी जाचक यांना आजपर्यंत दिलेले आश्वासन प्रत्यक्षात साकारण्यासाठी आज पासून जाचक यांना कार्यरत होण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी दिली आहे. येणारा हंगाम कसोटीचा असल्याने या कसोटीच्या हंगामात छत्रपतीचे गाळप व्यवस्थित होऊन कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जाचक यांच्या अभ्यासाचा फायदा होणार आहे. यासंदर्भात तीन महिन्यापूर्वी सर्वप्रथम महान्यूजने वृत्त दिले होेते.

छत्रपती कारखान्यातील सत्तेचे राजकीय हस्तांतर होणार याची अटकळ बांधली जात होती, मात्र ज्यांनी अखंड १७ वर्षे विरोधात काम केले, ते पृथ्वीराज जाचक पुन्हा राष्ट्रवादीबरोबर सत्तेत येतील असे राष्ट्रवादीतही सुरवातीस कोणाला वाटत नव्हते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जाचक यांनीही पवार कुटुंबियांबरोबर काम करण्याची तयारी केली. सहकारातील त्यांचा अनुभव, प्रशासन कौशल्य छत्रपती कारखान्यासाठी महत्वाचे ठरेल हे अजितदादांना ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी पटवून दिले त्यासाठी सातत्याने शिष्टाई केली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोशाध्यक्ष अमोल काटे यांनीही सुरवातीस प्रयत्न करीत समेटासाठी जाचक व पवार कुटुंबियांमध्ये भेटी घडवून आणल्या. नव्या पिढीला पवार कुटुंबियांचे महत्व पटवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.


अर्थात मी जसा सोमेश्वर अडचणीतून बाहेर काढला, तो राज्यात उंचीवर नेला, छत्रपती तर माझा घरातला कारखाना आहे, मी त्या कारखान्याची अप्रतिष्ठा कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भीष्मप्रतिज्ञा होती. त्या दृष्टीने त्यांनी पर्याय आखण्यास सुरवात केली होती. दुसरीकडे अनेक वर्षे विरोध केला, मात्र कारखाना टिकला पाहिजे, राजकीय स्वार्थापेक्षाही वडीलधाऱ्यांनी केलेले कष्ट टिकले पाहिजेत या भावनेतून सहकारात परस्पर सहकार्य करण्याची तयारी जाचक यांनीही स्वतःहून दाखवली. दोघांनी टाकलेले पाऊल छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील २६ हजार सभासदांच्या प्रपंचासाठी अत्यंत महत्वाचे होते. जाचक यांचा सहकारी कारखानदारीतील अभ्यासही महत्वाचा असून कोणत्याही परिस्थितीत राजकीय व्यूहनितीपेक्षा कारखाना महत्वाचा असल्याचे अजित पवार यांनी ठरवूनच या सहकारी चळवळीतील नव्या सहकार्याच्या सेतूस मान्यता दिली.

राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतोच, मात्र तो सहकारातही नसावा, किंबहूना सहकाराची नाळ ही सामान्यांच्या प्रपंचाशी थेट जोडलेली असते. यात जर उसाला प्रपतिटनी अगदी ५० रुपये जरी कमी मिळाले, तरी त्याचा फार मोठा फटका एका कुटुंबाला बसतो, त्याचा विचार करता सहकारातून समृध्दीकडे शेतकऱ्यांना नेण्यासाठी संस्थाही आर्थिकदृष्ट्या सक्षम व काटकसरीच्या असायला हव्यात. याकरीताच चांगल्या नेतृत्वाची आवश्यकता असते.

अजित पवार यांनी राजकारणात नेहमीच बेरजेच्या राजकारणाला अधिक महत्व दिले, त्याचाच हा परिपाक असून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली चर्चा आता फळाला आली आहे. सहकारातील साखर कारखान्यांच्या निवडणूकांना मुदतवाढ दिली असली तरी लवकरच निवडणूका होतील हे गृहीत धरता छत्रपती कारखान्यात आज जे घडणार आहे, त्यासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनीही गेली काही महिने देव पाण्यात घातले होते. आज त्यांचीही प्रार्थना फळाला येईल.

किरण गुजर, ज्येष्ठ नगरसेवक, बारामती – मी फक्त निमित्तमात्र आहे. माझ्यावर नैतिक जबाबदारी होती. अजितदादा आणि पवारसाहेबांचा निरोप मी संचालक मंडळास दिला. अजितदादांनी पृथ्वीराज जाचक यांना कामकाजात सामावून घेण्याचा निर्णय घेतला. छत्रपती कारखान्यासाठी ही महत्वाची घडामोड आहे आणि त्याचा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांच्या आर्थिक हितासाठी व कारखान्याच्या आर्थिक समृध्दीसाठी उपयोग होईल अशी आशा आहे. सहकारात अशाच प्रकारच्या सहकार्याची गरज असते. ती भरून निघेल असे वाटते.

Next Post
तरुणांच्या हातात तलवारी,दगड-धोंडे नव्हे तर पुस्तकं – लेखणी देणारे शिक्षणमहर्षीं !

तरुणांच्या हातात तलवारी,दगड-धोंडे नव्हे तर पुस्तकं - लेखणी देणारे शिक्षणमहर्षीं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group