तेलंगणा मधील पाच जण परीक्षा संपल्यानंतर मुंबईला फिरण्यासाठी म्हणून गेले. सध्याच्या पावसाच्या दिवसात वाहन तशी दमाने चालवली पाहिजेत, सावकाश चालवली पाहिजेत, पण इंदापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता थोडासा निसरडा बनला. चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि गाडीचा टायर फुटला आणि पाचही जणांचा जीवन प्रवासही संपला.
तेलंगण राज्यातील सहा विद्यार्थी मुंबईलामुंबईला मारुती सुझुकी कंपनीच्या बलेनो (नंबर टी.एस.०७ जी. एल. २५७४) या कारने फिरायला गेले होते गेले होते. मुंबईहून परतत असताना भिगवण नजीक डाळज क्रमांक ३ येथे आली, तेव्हा पाऊस पडत होता. त्यांची मारुती सुझुकी बलेनो ही कार पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर चालकाला अंदाज आला नाही आणि गाडी घसरतानाच गाडीचा टायर फुटला आणि झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच गेले व उरलेला एक जण गंभीर जखमी झाला.
हा अपघात पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातात फिरोज कुरेशी, रफिक कुरेशी, इरफान पटेल, मेहबूब कुरेशी, फिरोज कुरेशी यांचा अपघातात मृत्यू झाला तर अमीर सय्यद हा गंभीर जखमी झाला असुन, त्याच्यावर भिगवण येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातांनातर महामार्ग पोलिस व भिगवण चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे, फौजदार रूपेश कदम त्यांच्या सहकाऱ्यांनी व स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी भेट देत मदतकार्य केले.











