महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
आज एका अभिनेत्रीने मोदी सरकारवर हल्लाबोल केली, ती म्हणाली ७० वर्षात कॉंग्रेसने काहीच केलं नाही, तर आता ते तुम्ही विकताय, ते तुमच्या आजीनं हुंड्यात आणलेलं आहे काय? असा सवाल करून तिने धमाल उडवून दिली आणि नेटकऱ्यांना चर्चेसाठी मसाला पुरवला.
सध्या राजकारणात राजकीय नेत्यांपेक्षा नटनट्यांनाच चांगला भाव आला आहे. कंगना, रिया, अनुराग कश्यप, उर्मिला, सोनु सूदनंतर आज कॉंग्रेसमध्ये गेलेल्या नगमाने मोदी सरकारवर ट्विट करीत निशाणा साधला. फरक एवढाच की, आतापर्यंत सगळे मोदीविरोधकांवर तुटून पडले होते. आता नगमाने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
अभिनेत्री नगमा यांनी ट्विट करीत अरे भाई, कॉंग्रेस ने ७० सालों मे कुछ करा ही नही. . तो तुम जो बेच रहे हो, वो तुम्हारी नानी दहेज मे लाई थी क्या ? असा टोमणा मारला आहे. तिच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी नेटवर चर्चेला सुरवात केली. नगमा यांच्या ट्विटला काही कालावधीतच ३८ हजारहून अधिक नेटकऱ्यांनी रिट्विट करीत चर्चेत रंग आणला.
विशेष म्हणजे यानंतर नगमा यांनी अनेक ट्विट करीत थेट मोदी सरकारवरही निशाणा साधला. एनडीए म्हणजे नो डाटा अव्हेलेबल अशा शब्दांत त्यांनी व्यंगचित्राद्वारे टिका केली.










