• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रात गयी.. बात गयी.. दौंडमध्ये होर्डिंगला नावाला नोटीस, पुन्हा प्रशासनाचा हात लागलाच नाही!

tdadmin by tdadmin
June 26, 2024
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
रात गयी.. बात गयी.. दौंडमध्ये होर्डिंगला नावाला नोटीस, पुन्हा प्रशासनाचा हात लागलाच नाही!

बेकायदा होर्डिंग्जवर दौंड ला अद्याप ठोस कारवाई नाही! एकही होर्डिंग काढले नाही! प्रशासनाचा हलगर्जीपणा आणखी बळी घेण्याची वाट पाहते काय?

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह

दौंड : दौंड शहरासह तालुक्यातील रस्त्यालगत उभ्या असलेल्या भल्या मोठ्या लोखंडी बेकायदा होर्डिंग्जवर अद्यापपर्यंत ठोस कारवाई नाही, एकही बेकायदा होर्डिंग काढले नाही. संबंधित मालकांवर ठोस अशी कारवाई केली गेली नाही. प्रशासनाचा हा हलगर्जीपणा कोणाचा बळी गेल्यावरच सुधारणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई येथे बेकायदा होर्डिंग पडल्याने जीवितहानीची दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील जाहिरातीसाठी लावण्यात आलेल्या बेकायदा लोखंडी होर्डिंग वर तातडीने कारवाई करावी असा आदेश दिले होते.

मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला तालुका आणि स्थानिक प्रशासनाने केराची टोपली दाखवली असल्याचे चित्र आहे. दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी ग्रामपंचायत हद्दीतील तब्बल ५९ बेकायदा होर्डिंग धारकांना नोटीस बजावून पंधरा दिवसांच्या आत परवानगी घेतली आहे का? आवश्यक कागदपत्रे सादर करा, स्वतःहून हे होर्डींग्ज काढावे, पंधरा दिवसांच्या आत न काढल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी नोटीस बजावली होती.

नोटीस बजावून २५ दिवसांचा कालावधी उलटला, अद्यापपर्यंत एकाही बेकायदा होर्डिंग धारकांवर कारवाई केली नाही. उलट या होर्डींग्जवर जाहीराती लावणे सुरूच असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्ग, पाटस – दौंड अष्टविनायक रस्ता, तसेच राज्य आणि जिल्हा मार्गालगत रस्त्यालगत, मोठ्या इमारतींवर ठिकठिकाणी जाहीरातीसाठी बेकायदा लोखंडी होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत.

दरम्यान जागे झालेल्या प्रशासनाने तालुक्यातील बोरीपार्धी, बिरोबावाडी, सोनवडी, वाखारी, वासुंदे, देउळगावगाडा, भांडगाव, यवत, पाटस, बोरीभडक व कुरकुंभ या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सुमारे ५९ बेकायदा होर्डिंग मालकांना नोटीस बजावली होती. एकट्या पाटस ग्रामपंचायत हद्दीमध्येच २२ बेकायदा होर्डिंग आहेत. या लोखंडी होर्डिंग उभारणाऱ्या संबंधित मालकांनी कोणत्याही प्रशासनाची कायदेशीर परवानगी घेतली गेली नसल्याचे उघड आहे.

अत्यंत धोकादायक आणि अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या होर्डिंग्जधारकांना प्रशासन पाठीशी का घालत आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे. मागील कित्येक वर्षांपासून या लोखंडी होर्डिंग्ज मालकांनी जाहिरातीवर लाखोंची कमाई केली आहे, मग प्रश्न हा पडतो की, यामध्ये प्रशानाची आर्थिक टक्केवारी आहे का? पुढच्या महिन्यात जगदगुरु संत तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यात आगमन होणार आहे. सध्या तालुक्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने ऐन पालखी सोहळ्यात हे होर्डींग्ज पडून दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण?

दरम्यान, या संदर्भात दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांना विचारले असता, ते म्हणाले की, संबंधित होर्डींग्ज धारकांना नोटीस बजावली होती. काही होर्डींग्ज धारकांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. त्याची पडताळणी सुरू आहे. ३० जून च्या आत बेकायदा होर्डींग्ज काढण्यात येतील.

Next Post
शालेय विद्यार्थ्यांचे दाखला काढण्यास अडवणूक आणि आर्थिक लूट केल्यास संबंधित शाळांवर कारवाईचा दौंडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा!

बहुजनांनो सावध रहा! आपल्या मुलांना शाळेत काय शिकवलं जातंय यावर बारीक लक्ष ठेवा..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group