विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच खासदार सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर आल्या आहेत.
खासदार सुनेत्रा पवार आज सकाळी नऊ वाजल्यापासून बारामतीमधील सहयोग बंगला सहयोग सोसायटी या निवासस्थानी नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारत असून या ठिकाणी बारामतीकरांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.











