✒️डॉ चंद्रकांत पिल्ले, बारामती
तीन खासदार दोन आमदार
एकाच घरात नांदत आहेत
कार्यकर्ते बिचारे इथे
एकमेकांशी भांडत आहेत.
पक्ष जरी फुटला तरी
यांची सत्ता अबाधित आहे
विरोधक मात्र आजारी अन
राजकारणही बाधित आहे.
इथे दोन आमदार असूनही
अजून थोडी पोकळी आहे
नवीन उभरत्या नेतृत्वासाठी
वि.परिषदेची वाट मोकळी आहे.
सत्ता, खुर्ची, पद आणि पक्ष
मालमत्ता यांची स्थावर आहे
सत्तेत कुणीही असलं तरी
राजकारण यांची ‘पावर’ आहे.











