दौंड : महान्यूज लाईव्ह
घटना आहे दौंड तालुक्यातील कासुर्डी या गावची. लग्नानंतर सासरहून माहेरी आलेल्या सुहानी तुषार तम्मनर या नवविवाहितेने माहेरी आल्यानंतर भावाबरोबर शेत गाठले आणि अचानक आकाशात चमकणारी वीज खाली झेपावली. वीज अंगावर पडली आणि सारच होत्याचं नव्हतं झालं.
विश्रांतवाडी पुण्यात सासर असलेली सुहानी 11 जून रोजी माहेरी कासुर्डी येथे आली होती. सगळेच कुटुंबीय शेतात गेले असल्यामुळे ती देखील भावा बरोबर शेतात गेली. वडील सुदाम दगडू ठोंबरे आणि सारे कुटुंबीय शेतातच होते.
अचानक संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून आले वादळी वारे सुरू झाले आणि ढगातून विजांचा कडकडाट ऐकू येऊ लागला. अचानक काही करण्याच्या आत एक जोरदार आवाज झाला आणि सुहानी धाडकन खाली पडली. वीज तिच्या अंगावरच कोसळली होती.











