महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
मराठा समाजानंतर आता धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
आज औरंगाबाद येथे धनगर समाजाच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्य सरकारला गंभीर इशारा देण्यात आला.
राज्यात एकीकडे कोरोनाचा हाहाकार माजला असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. अशात आता मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर समाजच्या आरक्षणासाठी धनगर समाजानेही मोर्चे बांधण्यास सुरूवात केली.
औरंगाबाद धनगर आरक्षण विभागीय बैठकीत आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. धनगर आरक्षण प्रश्न तत्काळ सोडवा, अन्यथा मंत्रालयामध्ये आणि मंत्र्यांच्या घरात मेंढरे घुसवणार असल्याचा इशारा धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांनी दिला. त्यामुळे राज्यात आरक्षणाचा मुद्दा आता अधिक च गंभीर रुप धारण करण्याची शक्यता दिसत आहे.











