• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हे ड्रोनचं प्रकरण आता आवरायला हवं! मॉब लिंचिंगपर्यंत जाण्यापूर्वीच यावर उपाय हवा!

tdadmin by tdadmin
June 3, 2024
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
हे ड्रोनचं प्रकरण आता आवरायला हवं! मॉब लिंचिंगपर्यंत जाण्यापूर्वीच यावर उपाय हवा!

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

संपादकीय : ज्ञानेश्वर रायते.

गेले काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा, महिन्यांपासून हवेत उडणारे ड्रोन लोकांच्या काळजीचा विषय बनले आहेत आणि हळूहळू आता तर ते चिंतेचा विषय बनू लागले आहेत. पुणे जिल्ह्यात तर अधिकच चिंतेचा विषय बनला आहे. सामाजिक स्वास्थ या तथाकथित ड्रोनमुळे बिघडू लागले आहे. अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी लोक जागे राहत आहेत आणि आता गेल्या काही दिवसापासून गावामध्ये येणारी तिऱ्हाईत माणसं किंवा माळरानावरती गप्पा मारायला बसलेली मंडळी दिसली की, त्यांना आता पकडून मारण्याचे काम सुरू झाले आहे. या साऱ्या घटनांमध्ये ड्रोनचे प्रकरण आता गंभीर बनू लागले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडतात आणि हे ड्रोन आपली हेरगिरी करत आहेत. आपल्या शेतातील पिकांची हेरगिरी करत आहेत, वाड्यावस्त्यांवरील घरांची हेरगिरी करत आहेत आणि चोऱ्यांचे प्रकार घडत आहेत, अशा प्रकारच्या अफवा आणि चर्चा सुरू झाल्या आहेत. वस्तुतः गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये बारामती परिसरात असलेल्या विमान प्रशिक्षित कंपन्या रात्रीच्या वेळी त्यांची विमाने उड्डाण करतात अशी माहिती देत आहेत आणि त्यामुळे पोलीस देखील ही सर्व रात्रीच्या वेळी उडणारी तथाकथित ड्रोन हे विमाने असल्याचा निर्वाळा देत आहेत. खरंतर विमान कंपनीच्या प्रशिक्षकांनी आमची विमाने नेमकी कोणत्या कोणत्या भागात आहेत, कोणत्या कोणत्या दिवशी कुठे कुठे फिरली? याची एकदा माहिती देण्याची गरज आहे.

त्यांचे म्हणणे खरेच आहे, परंतु याला आणखी एक किनार आहे.  एरवी लग्न समारंभापासून ते राजकीय कार्यक्रमापर्यंत सभांपर्यंत ड्रोन पूर्ण माहिती असलेली लोकं विमान आणि ड्रोन यामधील फरक आम्हाला समजत नाही का? असा सवाल करू लागले आहेत. या सर्व लोकांचे म्हणणे असे आहे की, बारामती परिसरातील छोटी विमाने, हलकी विमाने जेव्हा उड्डाण करतात, तेव्हा ती कितीही उंचीवर असली तर त्यांचा आवाज येतो. मात्र आता उडणारे जे आहे, त्याचा कसलाही आवाज येत नाही, त्यामुळे ही विमाने नाहीत तर हे ड्रोनच आहेत असा समज या लोकांचा आहे.

आता गावागावात ड्रोनची ही चर्चा जोर धरू लागली आहे. रात्रीच्या वेळी लोक जागे राहू लागले आहेत आणि ड्रोन उडवणारे लोक हे चोर आहेत असा त्यांचा पक्का समज होऊ लागला आहे. सार्वत्रिक सामाजिक चिंतेची स्थिती लक्षात घेत आता यात लोकप्रतिनिधींनी देखील उडी घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्यांनी देखील या ड्रोन संदर्भात खातरजमा करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

यातील महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, दोन दिवसांपूर्वीच बारामतीतील जळगाव कडेपठार येथे पुण्यावरून आलेल्या दोघा जणांना, ते ड्रोन उडवणारे असल्याचे समजून लोकांनी मारहाण केली, तर नगरहून पाहुणे बनून बारामती तालुक्यातील जिरायती गावात निघालेल्या दोघाजणांचा एका गावातील ग्रामस्थांनी पाठलाग केला.

या लोकांना हे दोघेजण एवढे घाबरले की,  त्यांनी त्यांची दुचाकी आणखी वेगात चालवली. त्यांनी दुचाकी वेगात चालवल्याने लोकांचा संशय आणखी पक्का झाला आणि ते आणखी दुप्पट वेगाने त्यांच्या पाठलाग करू लागले. अखेर या भागात नोकरी असलेल्या नगरकरच्या दोघांना रस्ता नीट समजला नाही आणि त्यांची दुचाकी एका नाल्यात पडली. दरम्यानच्या काळात हे दोघेजण मद्यप्राशन केलेले असल्याने साहजिकच लोकांनी त्यांना बेदम चोप दिला. त्यांच्याकडून संदिग्ध उत्तरे मिळू लागल्याने लोकांचा संशय आणखी बळावतो. मात्र सध्या माळरानांवर किंवा निर्जन ठिकाणी दारूच्या पार्ट्या करणारे ड्रोन उडवणारेच आहेत असे समजून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात झाली आहे.

हा प्रकार येत्या काही दिवसांमध्ये मॉब लिंचिंग मध्ये परावर्तित होऊ शकतो. लोकांची भीती, लोकांची वाढणारी चिंता आणि त्यातून वाढणारा राग हा कोणाच्या तरी मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो, याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी यामध्ये इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक हस्तक्षेप करायला हवा.

बऱ्याचदा वेळ निघून गेल्यानंतर आणि घटना घडून गेल्यानंतर आपल्याकडे प्रशासनाला जाग येते, मात्र घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधित उपाययोजना जर केल्या, तर त्याचा परिणाम आणि फायदाही होऊ शकतो, हे न समजण्याइतके प्रशासन दूधखुळे नाही. मात्र लक्षात कोण घेतो? अशा स्वरूपाची परिस्थिती सध्या पाहायला मिळतेय.

Next Post
बारामती सराफ असोसिएशनच्या अध्यक्षपदी किरण आळंदीकर यांची फेरनिवड!

बारामती सराफ असोसिएशनच्या अध्यक्षपदी किरण आळंदीकर यांची फेरनिवड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group