बारामती : महान्यूज लाईव्ह
जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक तंबाखू विरोधी दिन जाहीर केला आहे त्यानुसार 31 मे रोजी जगभरात हा दिवस साजरा केला जातो यावर्षी तंबाखूच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीची संकल्पना जागतिक आरोग्य संघटनेने आखली होती त्यानुसार बारामतीत आयएमए च्या वतीने जनजागृती करण्यात आली.
आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीत बारामतीतील डॉक्टरांनी त्यांच्या त्यांच्या दवाखान्यात व हॉस्पिटलच्या कार्यक्षेत्रात तंबाखू सेवनाविरुद्धचे संदेश देणारे पोस्टर्स आणि फलक आणि स्टिकर्स लावून जनजागृती केली.
लहान मुले व तरुणांचे संरक्षण करून तंबाखू विरोधात जनजागृती कार्यक्रमाला हातभार लावण्यासाठी आयएमएच्या वतीने महाराष्ट्रात आवाहन करण्यात आले होते त्यानुसार आयएमएच्या बारामती शाखेने ही मोहीम बारामतीत राबवली. आय एम ए च्या बारामतीच्या अध्यक्षा डॉ. साधना कोल्हटकर, मानद सचिव डॉ. निकिता मेहता, समितीच्या सदस्या डॉ. वर्षा सिधये, डॉ. एम आर दोशी, डॉ. अमर पवार, डॉ. सौरभ मुथा यांनी हा जनजागृतीचा कार्यक्रम राबवला.











