• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापुरात दोन पोलिसांना तातडीने झेड प्लस सुरक्षा द्या ! तहसीलदारांवर हल्ला झालाय, पुढचा कोणाचा नंबर?

tdadmin by tdadmin
May 29, 2024
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
इंदापूरच्या तहसीलदारांवर अचानक हल्ला! वाहनाची तोडफोड! धक्काबुक्की चा प्रयत्न!

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह 

इंदापूर : आपल्याकडे लेकी बोले, सुने लागे अशी एक म्हण आहे. रिपब्लिकन पक्षाने इंदापूरच्या तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्यानंतर या हल्ल्याला काही घरभेदी ही कारणीभूत आहेत असा संशय व्यक्त करत एक उपरोधक मागणी केली आहे. 

यामध्ये वाळू तस्करांवर कारवाई करण्याचा ठेका घेतलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आता तातडीने पोलीस संरक्षण द्या, कारण ते अत्यंत जीवावर बेतणारे काम करत आहेत, जर गुन्हेगार तालुक्याच्या प्रमुखावर हल्ला करण्यास भीत नसतील तर या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची काय कथा? अशा स्वरूपाची उपरोधिक भीती व्यक्त करत त्यांना झेड प्लस सुरक्षा द्या अशी मागणी केली आहे. या अजब मागणीची सध्या गजब चर्चा इंदापुरात सुरू आहे.

२४ मे रोजी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील व चालक मल्हारी मखरे यांच्यावर भरदिवसा संविधान चौकात झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे सरकारी अधिकारी कर्मचारी सुरक्षीत राहिला नसल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे निवेदनात नमूद करून त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या अशी मागणी आरपीआयचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी मखरे व तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना केली आहे.

संबंधित प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २४ मे २०२४ रोजी इंदापूरचे कर्तव्यदक्ष तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्यावर वाळू माफियांनी जिवघेणा हल्ला केला. त्यामधून ते थोडक्यात बचावले, यानंतर पोलीसांनी तात्काळ काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. परंतु इंदापूर पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी हे रात्रंदिवस या वाळु तस्करांचा पाठलाग करत असतात, त्यांना हॉटेलमध्ये किंवा नदीकाठी निर्जन ठिकाणी भेटतात, त्यामुळे या दोन पोलीसांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे.

 त्यांच्या जिविताच्या रक्षणासाठी त्यांना ताबडतोब झेड प्लस दर्जाचे पोलीस संरक्षण द्यावे, तसेच  ते वापरत असलेल्या मोबाईल फोनचे व त्यांच्या नातेवाईकांचे मोबाईल फोनचे सीडीआर व कॉल डिटेल्स तपासण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. 

अन्यथा इंदापूर पोलीस स्टेशन समोर सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्या दोन्ही पोलिसांचे वाळू माफियांशी लागेबांधे असल्याचा आरोप केला जात असून त्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.

Next Post
मध्यरात्रीच्या अंधारात मारुती अल्टो कालव्यात कोसळली.. कुटुंबातील सहा जणांच्या मृतदेहासमवेत मुलगी रात्रभर गाडीत बसून होती!

मध्यरात्रीच्या अंधारात मारुती अल्टो कालव्यात कोसळली.. कुटुंबातील सहा जणांच्या मृतदेहासमवेत मुलगी रात्रभर गाडीत बसून होती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group