धुळे : महान्यूज लाईव्ह
कायदा आणि सुव्यवस्था कितीही सक्षम केली तरी त्यामध्ये किती पळवटा राहतात किंवा गुन्हेगार कसे वागतात याचा केळसपणा प्रकार धुळे जिल्ह्यात पाहायला मिळाला. गावाकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत असलेल्या महिला आणि तिच्या मुलाकडे पाहून कोणीच मदतीला नाही याची खात्री पडल्याने दोन नरधमाने रात्रीच्या अंधारात मुलासमोर महिलेवरती आळीपाळीने बलात्कार केला.
या घटनेमुळे धुळे हादरले असून पिंपळनेर बंदची हाक व्यापाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेत पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केली असून, पीडीतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सामानांच्या संतापात भर पडले असून आदिवासी बांधवांनी पिंपळनेर बंदची हाक दिली आहे.
या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी, धुळे जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील 39 वर्षीय महिला तिच्या दहा वर्षीय मुलासह सटाणा येथील व्यापाऱ्याकडे मजुरीसाठी गेली होती. कांदा व्यापाऱ्याकडील काम संध्याकाळी संपल्यानंतर ती व तिचा मुलगा संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सटाणा येथून घरी निघाले. रात्री आठ वाजता पिंपळनेर बस स्थानकावर आल्यावर गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत राहिले.
मात्र बस काही मिळाली नाही. रात्रीचे अकरा वाजले. हे मायलेक काहीतरी वाहन मिळेल म्हणून वाट पाहत बसले होते. त्याचवेळी त्यांच्या शेजारी एक पिकअप गाडी येऊन थांबली. या गाडीच्या चालकाने व गाडीतील व्यक्तीने त्यांची विचारपूस केली. तेव्हा आम्ही तुम्हाला गावी सोडतो असे सांगत गाडीत बसवले आणि बैल मार्केटमधील ओट्यावर नेऊन गाडी थांबवली.
मुलाला दमबाजी करत व मारहाण करत या महिलेला ओट्यावर ओढून नेले व आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या दोघांनी वाहन घेऊन पळ काढला. दरम्यान या घटनेनंतर महिलेने व तिच्या मुलाने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यावेळी काही नागरिक जमा झाले. त्यांनी पोलिसांना फोन केला. गस्तीवर असणारे पोलीस त्या ठिकाणी पोचले. तेव्हा या महिलेने घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी काही वेळातच पिंपळनेर शहरातील इंदिरानगर भागात राहणाऱ्या निलेश सतीश निकम व स्वप्नील शिवाजी वाघ या दोन संशयकांना ताब्यात घेतले.











