• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजीव गांधींची हत्या अन् अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरचे ते असह्य 24 तास..!

tdadmin by tdadmin
May 24, 2024
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
राजीव गांधींची हत्या अन् अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरचे ते असह्य 24 तास..!

अॅड. गणेश आळंदीकर, सोमेश्वरनगर, बारामती

खरं तर राजीव गांधीची हत्या हा संपूर्ण भारताला बसलेला ऐतिहासिक धक्का होता. त्या दृष्टीने माझे दुःख खूपच छोटे आहे, मात्र ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, ज्यांच्या स्वप्नपूर्ती करता मी झगडलो, त्या माझ्या वडिलांच्या दशक्रिया विधीला देखील मला येता आले नाही, ही सल आज ही 33 वर्षानंतर माझ्या मनात कायम राहिली.

त्यावेळी मी केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरी करत होतो. पुण्याच्या के.ई.एम. हॉस्पिटल मध्ये वडिलांवर उपचार चालू असतानाच मी पाषाण ग्राउंड वर भरतीसाठी परीक्षा दिली व उत्तीर्ण झालो. दवाखान्यातूनच वडिलांना दादा आत्ता मला नोकरी लागली आहे.आपल्या घरावरचे छप्पर लवकरच निघणार आहे तुम्ही काळजी करू नका असे आश्वासन देवुन मी माझ्या ट्रेनिंगला गुजरात जवळ गांधीनगर येथे रुजू झालो.

अवघ्या दोन महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला इलेक्शन ड्युटीसाठी जुनागडला जावे लागले. तिथे पोहोचल्यानंतर मोठे बंधू किरण यांनी वडिलांच्या निधनाची पोस्टाद्वारे तार पाठवली. त्यानंतर तीन दिवसांनी मला विचारण्यात आले, तुम्हाला सुट्टीला जायचे आहे का? तुमचे वडील गेले आहेत. मी दहा दिवसाच्या सुट्टीसाठी विनंती केली असता, कशीबशी सहा दिवसांनी मला सुट्टी मिळाली.

अंत्यविधी, सावडणे वगैरे विधी तर हाती लागलेच नव्हते. मात्र दशक्रिया विधीला २२ मे ला गावी पोहोचण्याची खात्री होती. २१ मे १९९१ रोजी अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर दुपारी बारा वाजताच पोहोचलो. संध्याकाळच्या रेल्वेची वाट पहात असतानाच संध्याकाळी राजीव गांधी यांची तामिळनाडू येथे हत्या झाल्याच्या बातम्या पसरल्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे रोखल्या गेल्या.

तासातासाला रेल्वेचे वेळापत्रक बदलत होते. भारतात कुठेही काय झाले, तरी मुंबई मात्र संवेदनशील टप्प्यावर असते याची प्रचिती आली. मुंबई बंद झाली असल्याने तिथे रेल्वे गाड्या जाणार नाहीत, अशी घोषणा करण्यात आली आणि वडिलांचा दशक्रिया विधी आपल्याला सापडणार नाही याची खात्री झाली. 24 तास अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी गाड्या सुरू करण्यात आल्या आणि मी २३ मे ला मुंबईला पोहोचलो व वडीलांच्या निधनानंतर चक्क ११ व्या दिवशी घरी पोहोचलो .

अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर एकीकडे राजीव गांधी यांची हत्या कशी झाली ही माहिती घेण्याची उत्सुकता तर दुसरीकडे आपण वडिलांचे निधनानंतर दहाव्या दिवशी तरी घरी पोहोचू अशी आशा होती. या द्विधा मनस्थितीत अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर काढलेले ते 24 तास आजही जेव्हा 21 मे येतो, तेव्हा सर्व आठवणींचा पट एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यासमोर येतो.

वीस वर्ष झोपडीत काढल्यानंतर मी केंद्रीय राखीव पोलीस दलात असताना आम्ही 1994 साली घर बांधले, पण त्याच्या वास्तुशांतीला देखील मला येता आले नाही. मात्र त्या दुःखापेक्षा वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या दशक्रिया विधीला देखील येता आले नाही हे दुःख कायम स्मरणात राहीले. सेनादलातील जवानांचा खूप मोठा त्याग असतो हे जवळून अनुभवता आले. आयुष्यात आलेल्या अनेक अविस्मरणीय आठवणी पैकी एक आठवण आज राजीव गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त जागृत झाली.

(लेखक बारामती तालुक्यातील प्रसिद्ध विधीज्ञ असून ज्येष्ठ पत्रकारही आहेत, तसेच ते सराफा बाजारातील तज्ञही आहेत. संपर्कासाठी – 9423020255)

Next Post
इंदापूरच्या तहसीलदारांना सांगा.. जर हाच असेल गुन्हा तर तो करा पुन्हा पुन्हा! तालुका तुमच्या मागे आहे!

इंदापूरच्या तहसीलदारांना सांगा.. जर हाच असेल गुन्हा तर तो करा पुन्हा पुन्हा! तालुका तुमच्या मागे आहे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group