इंदापुरातील भीमा नदीच्या पात्रात बोट बुडाली. यातील सहा जणांना शोधण्यासाठी एनडीआरएफ ची टीम या ठिकाणी आली होती. या टीमने सारे मृतदेह शोधले. परंतु त्याच वेळी एक आणखी एक दुर्दैवी बातमी समोर आली, ती म्हणजे नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या पात्रात बुडालेल्यांच्या शोधासाठी गेलेली एसडीआरएफ च्या पथकातील एक बोट बुडाल्याने तीन जवानांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या सुगाव बंधाऱ्यात 22 मे रोजी दोघेजण बुडाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी नगर जिल्ह्यातील एसडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले होते. हे पथक या दोघांना शोधत असताना एका जणांचा मृतदेह सापडला.
मात्र त्यांचा शोध घेणाऱ्या पाच जवानांची बोट अचानक उलटली. या बोटीमधील तिघा जवानांचा दुर्दैवीरित्या बुडून मृत्यू झाला असून एका जवानावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेने मात्र हळहळ व्यक्त होत आहे.











