भाऊकी आणि गावकी कोणत्या थराला जाईल याचा काही नियमच उरलेला नाही मात्र सख्ख्या भावानेच आपल्या सख्ख्या भावाचं अख्ख कुटुंब संपवलं तर? अंगावर काटा आणणारी ही घटना सामुहिक हत्याकांडाची! अर्थात भावाची हत्या करून त्याने स्वतःच आत्महत्या केली असा बनवण्याचा होता पण घडलं!
उत्तर प्रदेशातील सीतापुर जिल्ह्यातील पालापूर या गावात 11 आणि 12 मे दरम्यान एकाच रात्रीत अख्ख कुटुंब संपवलं गेलं. एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या सख्या भावाने केली. एकाच कुटुंबातील या सामूहिक हत्याकांडाने उत्तर प्रदेश देखील हादरून गेले. एका बंदुकीच्या गोळीमुळे पोलीस गुन्हेगार भावापर्यंत पोहोचले.
गावातील अजित सिंहला त्याच्या भावाचा राग होता. त्यामुळे त्याने भाऊ अनुराग सिंहची हत्या केली, त्याला फक्त त्याची एकट्याचीच हत्या करायची होती, मात्र आईने हा प्रकार पाहिल्याने त्याने आईला देखील मारले व नंतर एका पाठोपाठ एक कोणालाच कशाला जिवंत ठेवायचे असे समजून त्यांनी साऱ्यांची हत्या केली. अनुराग सिंह याची पत्नी आणि दोन मुलांची त्याने हत्या केली.
अर्थात घटना घडली, तेव्हा परिस्थिती अशी होती, की अनुराग सिंह याच्या डोक्यात दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मात्र त्याला गोळी झाडतानाच ती गोळी त्याच्या डोक्याला छेदून आईच्या डोक्यातही गेली त्याची गोळी दुसऱ्याच व्यक्तीच्या शरीरात आढळली. त्यामुळे अनुरागने आईवर गोळी झाडली आणि स्वतः आत्महत्या केली असे त्याला दाखवायचे होते. मात्र ज्याला आत्महत्या करायची असते, तो एकाच गोळीत मरणार; त्याला दुसरी गोळी का लागली? असा संशय पोलिसांना आला आणि या गोळीनेच पोलिसांना मारेकऱ्यापर्यंत पोहोचवले.











