राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील आणि पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कुरकुंभ येथील फिरंगाई टेक्स्टाईल मार्केटमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा वेश्याव्यवसायवर दौंड पोलिसांनी कारवाई केली, मात्र ज्या फिरंगाई टेक्सटाईल मार्केटमध्ये ही कारवाई केली. ती जागा या व्यवसायासाठी उपलब्ध करून देणाऱ्या जागा आणि इमारत मालकांवर सहआरोपी म्हणून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.
मागील काही दिवसांपासून फिरंगाई टेक्सटाईल मार्केट मधील पत्रा शेडमध्ये बेकायदा व व्यवसाय सुरू होता. याबाबत दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ दखल घेत याठिकाणी छापा टाकून कारवाई केली. तीन परप्रांतीय महिलांची सुटका करून तिघा आरोपींवर गुन्हा दाखल करून अटकही केली.
मात्र ज्या जागेमध्ये आणि ज्यांच्या मालकीचे फिरंगाई टेक्सटाइल मार्केट आहे, तेथे हा बेकायदा देहविक्रीचा वेश्याव्यवसाय खुलेआम सुरू असताना त्याचा थांगपत्ता जागामालक आणि इमारतमालकाला माहित नसावा हे मात्र नवलच. संबंधित जागामालकांनी भाडेतत्त्वावर ही जागा संबंधित व्यक्तींना व्यवसायासाठी दिली होती, त्यावेळी या जागेत कोणता व्यवसाय केला जाणार आहे याची माहिती संबंधित जागा मालकांनी घेतली नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित जागामालकाच्या संगनमतानेच हा बेकायदा वेशाव्यवसाय कशावरून सुरू नसेल ? अभा प्रश्न कुरकुंभ परिसरात चर्चेत आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी त्याबाबत फिरंगाई टेक्सटाइल मार्केटच्या मालकाचीही सखोल चौकशी करून या व्यवसायाला पाठीशी घातल्याप्रकरणी सहआरोपी करून गुन्हा दाखल करून कारवाई करावी. अशी मागणी कुरकुंभ परिसरातील नागरिक करीत आहेत.











