दौंड, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील फिरंगाई टेक्सटाईल मार्केट मध्ये पत्र्याचे शेडमध्ये अवैधरित्या वेश्याव्यवसाय चालवत असलेल्या अड्ड्यावर दौंड पोलीसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. तीन महिलांची सुटका करून तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही माहिती दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. याप्रकरणी दिवाकर मुहू शेट्टी (वय ५४ वर्षे मुळ रा. बल्लदूर, तोटा ता.मणी पोस्ट पादूरपोस्ट, जि. मणी राज्य कर्नाटक सध्या रा. फिरंगाई टेक्सटाईल मार्केट, पर्त्याचे शेड, कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे.), पिंटू कुमार कैलास भुईया (वय ३१ वर्षे रा. खैरा ता. मयूरईन्ड जि. चतरा राज्य झारखंड) आणि श्रीधर लक्ष्मण शेट्टी ( रा. सन शाईन ग्रीन पार्क, ब्लिडींग नं. बी विंग फ्लॅट नंबर ०२, फादरवाडी, वसई ईस्ट, वसई पालघर यांच्या विरूध्द कुरकुंभ येथील फिरंगाई टेक्सटाईल मार्केट) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कुरकुंभ येथील फिरंगाई टेक्सटाईल मार्केट मध्ये अवैध वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना गुप्त बामतीदाराच्या मार्फत मिळाली होती. त्यानुसार दौंड पोलीसांनी सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून छापा मारला असता, याठिकाणी ३ पिडीत महिला मिळून आल्या. त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत जात असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी या पिडीत तीन महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई योगेश गोलांडे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोपीवर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या आरोपींना अटक करून दौंड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतिश राऊत हे करीत आहेत.











