नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
एकीकडे निवडणूकीचे वारे घमासान वाहत असताना व दुसरीकडे भाजप सरकारच्या आयटी, ईडी, सीबीआय़वर देशभऱातील विरोधक आरोप करीत असतानाच आज दुपारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे दिल्लीच्या आयकर विभागाच्या कार्यालयाला मोठी आग लागली आहे.
अचानक लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून चौथ्या मजल्यावर ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग मोठी असल्याचे सांगितले जात असून ही आग विझविण्यासाठी अग्मीशमन दलाचे जवानांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
दिल्ली पोलिस मुख्यालयाच्या पाठीमागेच आयकर विभागाची ही इमारत असून २१ अग्नीशमन दलाच्या वाहनांद्वारे ही आग विझवली जात आहे. दुपारी तीन वाजता आयटीओ येथील आयकर विभागाच्या कार्यालयात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानही तातडीने तेथे पोचले. दरम्यान ही आग कशामुळे लागली ही माहिती मात्र मिळू शकलेली नाही.











