बारामती : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या सभेदरम्यान नरेंद्र मोदींनी उसाला आमच्याच काळात एफ आर पी वाढवली अमित शेतीला दिलासा दिला शरद पवारांनी काहीच केले नाही अशा स्वरूपाची अप्रत्यक्ष टीका केली होती त्याला रोहित पवारांनी आकडेवारीनिशी उत्तर दिले आहे.
रोहित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरसा दाखवताना नमूद केले आहे की, मोदीसाहेब, तुमचे टेलीप्रॉम्टर जुमलेबाज असले तरी थापा मारता मारता, ते कधीतरी चांगल्या गोष्टी आठवण्यास भाग पाडते. तुमच्या टेलीप्रॉम्टरने तुम्ही दहा वर्षात उसाची एफआरपी २१० रुपयावरून ३४० रुपये म्हणजेच 2100 रुपयावरून 3400 रुपये केल्याचे सांगत तुमचे भरभरून कौतुक केले.
तुम्ही दीडपट म्हणजेच ६१% वाढ केली म्हणून इतके कौतुक करून घेत आहात, तर मग पवारसाहेब केंद्रात कृषिमंत्री असताना उसाची FRP दहा वर्षात ७४ वरून २२० रु केली. म्हणजे 740 वरून 2200 रूपये केली. ती तिप्पट म्हणजे २००% वाढवली. ऊसच नाही तर कापूस, सोयाबीन, फळबागा, कांदा उत्पादक अशा सर्वच शेतकऱ्यांनाही न्याय दिला. तर मग आम्ही किती कौतुक करायला हवे?
मग आता तुम्हीच सांगा, शेतकऱ्यांना दिलासा कुणी दिला? असा प्रश्न त्यांनी नरेंद्र मोदींना विचारला आहे. नरेंद्र मोदींनी पुण्यातील सभेत शरद पवारांची भटकती आत्मा असा उल्लेख केल्याने राज्यभरातील नागरिक संतापले आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी नरेंद्र मोदींच्या सरकारने केलेल्या कामगिरीचे कौतुक शरद पवारांनी कृषिमंत्री असतानाच्या काळात केलेल्या कामापेक्षा किती तोकडा आहे त्याचा आरसा दाखवला आहे.











