बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील नव्याने हद्दवाढ झालेल्या जमिनीचे रेडीरेकनरचे दर मूल्यांकन जैसे थे ठेवण्यात आलेय. परंतु मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने रेडी रेकनर दरा मधील सूचीमध्ये एक शून्य घालवल्याने करोडो रुपयांच्या जमिनीचे मूल्यांकन लाखांमध्ये झाले आहे.
बारामती शहरातील हद्दवाढ झालेल्या वाढीव क्षेत्रामध्ये 2022 – 23 आणि 2023- 24 या वर्षाकरिता जैसे थे, रेडी रेकनर चे दर ठेवण्यात आले आहेत. परंतु बारामतीच्या जळोची क्षेत्रातील सर्वे नंबर 232, 233, 234, 235, 236, 240, 245, 247, 248, 249, 250, 282 या गटाकरिता 3900 चौरस मीटर रेडी रेकनर चा दर होता, परंतु याच दर पत्रकात केवळ 390 चौरस मीटर मूल्यांकन केले जात आहे.
पत्रकार जितेंद्र जाधव यांनी त्यांच्या जमिनीचे मूल्यांकन करण्याकरिता मागणी केली असता, सदरची बाब समोर आली. त्यांनी ही माहिती दिली. वरील सर्वे नंबर व्यतिरिक्त नव्याने निवासी विभागात समाविष्ट झालेल्या सर्वे नंबर जमिनी गट क्रमांक 24, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 231 याकरिता प्रति चौरस 3200 रुपये रेडी रेकनर दराऐवजी 320 चौरस मीटर मूल्यांकन दर सूचीमध्ये दाखवण्यात आले आहे त्यामुळे येथील करोडो रुपये जमिनींचे मूल्यांकन लाखात घसरले आहे.
पत्रकार जितेंद्र जाधव यांनी त्यांच्या जमिनीचे मूल्यांकन करण्याकरिता मागणी केली असता, सदरची बाब समोर आली. या संदर्भात त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाला लेखी पत्र दिले असून याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी तसेच वर्षभरात या जमिनीचे झालेले दस्त चुकवण्यात आलेला शासनाचा महसूल याची चौकशी करून यामध्ये पारदर्शकता कशी येईल. याकरिता प्रयत्न होणे गरजेचे आहे.
शहरातील बरेचश्या जमिनीचे गट हे मुख्य रस्त्यानजिक आहेत. काही गट हे छोट्या रस्त्यालगत सुद्धा आहेत. या जमिनीचे गटाचे मूल्यांकन मुख्य रस्त्यालगत असल्याने, मूल्यांकन ज्यादा आकारले जाते. त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांना बांधकाम परवानगी घेताना जादा विकासदर भरावे लागतात. तरी अशा गटांची दुरुस्ती होऊन वाढवलेल्या जमिनीचे मूल्यांकन कमी झाले पाहिजे अशी मागणी क्रेडाईचे माजी अध्यक्ष दीपक काटे यांनी केली आहे











