पुणे : महान्यूज लाईव्ह
आत्तापर्यंत पॉर्न व्हिडिओ प्रौढ व्यक्ती बनवतात अशा प्रकारचा समज होता, परंतु लोणावळ्यात तरुण पोरा पोरींनी आपलेच पॉर्न व्हिडिओ बनवायचे ठरवलं आणि विकायची ठरवलं, त्यासाठी त्यांनी लोणावळ्यातील एक बंगला भाड्याने घेतला. पोलिसांनी त्यांचे बिंग फोडलं असलं, तरी नीती आणि अनितीच्या गप्पा आता संपल्या आहेत, संस्काराचे तीन तेरा झाले आहेत आणि शाळेत जाणारी आपली मुलं नेमकी काय करतात? त्याची कुठलीही कल्पना पालकांना कशी नाही याचं एक भयानक वास्तव या निमित्ताने पुढे आले आहे. लोणावळ्यात ग्रामीण पोलिसांनी 15 जणांना, की ज्यामध्ये पाच तरुणी आणि दहा तरुणांचा समावेश आहे, त्यांना पॉर्न व्हिडिओ बनवताना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी जे सडकसख्याहारी ताब्यात घेतले आहेत, त्यामध्ये अगदी 19, 20 वर्षाची मिसरुड न फुटलेली मुलं देखील आहेत. यामध्ये मावळ, हरियाणा, उत्तर प्रदेश, मुंबई, ठाणे, गुजरात येथील या मुलांचा समावेश आहे. यामध्ये विष्णू मुन्ना साहेब कोलकत्ता, जावेद हबीबुल्ला खान आहारा उमरी जिल्हा बस्ती उत्तर प्रदेश, बुद्धसेन बर्दाणीलाल श्रीनिवास महाकाली कॉलनी चंद्रपूर, समीर मेहरा आलम अमरोहा उत्तर प्रदेश, अनुप मिथिलेश चौबे काशीबाई चाळ कांदिवली ईस्ट मुंबई, आकेश गौतम शिंदे मळवली ता. मावळ,
बंगला मालक सुखदेव चांगदेव जाधव मळवली ता. मावळ, सनी विलास शेंडगे मळवली ता. मावळ, अनिकेत पवन शर्मा रुद्राक्ष कॉलनी पलसाना सुरत, वंशज सचिन वर्मा डेहराडून, रामकुमार श्री भगवान यादव रोनक सिटी हरियाणा, राहुल सुरेश नेवरेकर वागळे इस्टेट ठाणे, मनीष हिरामण चौधरी शास्त्रीनगर हरियाणा या दहा जणांसह पाच तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या सर्वांना पॉर्न व्हिडिओ करून पैसे कमवायचे होते त्यासाठी त्यांनी लोणावळ्यातील एक बंगला देखील भाड्याने घेतला होता आणि वेगवेगळ्या अश्लील ओटीटी प्लॅटफॉर्म साठी हे तरुण आणि तरुणी पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली. आणि लोणावळ्यातच हे 15 जण बिनधास्तपणे पॉर्न व्हिडिओ करत असल्याचे दिसून आले.
29 मार्च 2024 रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान पाटण गावच्या हद्दीत अर्णव व्हिला या बंगल्यात हे पॉर्न व्हिडिओ शूट होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी त्या ठिकाणी धाड घातली. तेथून पॉर्न व्हिडिओ शूट करण्यासाठी लागणारे कॅमेरे आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.











